बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. अवघ्या महिनाभरातच या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे चित्रपटावरून देशभरात अनेक वाद निर्माण झाले आहेत. आता बाहेरच्या देशातील कलाकाराने चित्रपटावर टीका केली आहे.
‘पठाण’ चित्रपट बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही होत होती. आता याच चित्रपटावर बांगलादेशमधील अभिनेत्याने भाष्य केलं आहे. दीपजॉल असं या अभिनेत्याचे नाव असून तो बांगलादेशी चित्रपटात प्रामुख्याने नकारात्मक भूमिका साकारताना दिसतो. तो असं म्हणाला,” प्रेक्षकांनी पाहावेत म्हणून आम्ही उत्तम चित्रपट बनवायचा प्रयत्न करत आहोत. जर हिंदी चित्रपट आमच्याकडे दाखवले तर आमच्या चित्रपटांना याचा फटका पडू शकतो.
“मला पाकिस्तान, बांगलादेश…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया
तो पुढे म्हणाला, “गेल्या काही महिन्यात आमच्या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे आता प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत. आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर पाहता येतील असे चित्रपट बघायचे आहेत. बॉलिवूड चित्रपटांविषयी तो असं म्हणाला, त्या चित्रपटांमध्ये खूप सारे अश्लील सीन्स व गाणी असतात, आमच्या प्रेक्षकांना कौटुंबिक चित्रपट पाहण्याची सवय आहे. मनोरंजनातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना संदेश देत असतो.” डेली स्टार्सशी बोलताना त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडच्या वाईट काळावर रणबीर कपूरने केलं भाष्य; म्हणाला “पठाणचे…”
‘पठाण’ चित्रपट बांगलादेशमध्ये प्रदर्शित होण्याआधीच अभिनेत्याने टीका करण्यास सुरवात केली आहे. गेल्या ८ वर्षात एकही बॉलिवूड चित्रपट बांगलादेशात प्रदर्शित झालेला नाही. नुकताच बांगलादेश माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. दरम्यान या चित्रपटात शाहरुख सह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.