बॉलिवूड चित्रपटसृष्टीत लोकप्रिय असलेली डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही ही कायम चर्चेत असते. सोशल मिडियावरचे तीचे बोल्ड फोटोशूट आणि रीयालिटि शोमधले तिचे लूक्स चांगलेच व्हायरल होत असतात. याबरोबरच ती इतरही बरेच लाईव्ह शो करत असते. नुकतंच तिच्या एका शोला परवानगी न मिळाल्याने नोरा सध्या चर्चेत आली आहे.

बांगलादेशच्या ढाका शहरात नोरा एका लाईव्ह डान्स शोसाठी जाणार होती. त्यासाठीच परवानगी बांगलादेश सरकारने नाकारल्याचं वृत्त समोर आलं आहे. डॉलर्स वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कारण सर्वप्रथम समोर येत आहे. बांगलादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या नोटिसनुसार वैश्विक अर्थस्थिती लक्षात घेता विदेशी चलनाचा तुटवडा भासू नये यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : “तर मी स्वतः माफी…” स्टँड अप कॉमेडीयन झाकीर खानने केला त्याच्या नव्या वेबशोबद्दल खुलासा

‘वूमन लीडरशीप कॉर्पोरेशन’ द्वारा आयोजित केलेल्या एका समारंभात पुरस्कार प्रदान करण्यासाठी नोरा फतेहीला आमंत्रण दिलं गेलं होतं. पण विदेशी चलनात झालेल्या घसरणीमुळे यासाठी परवानगी देणं शक्य नसल्याचं बांगलादेश सरकारने सांगितलं आहे. केवळ नोराच नाही तर इतरही भारतीय कलाकारांना बांग्लादेशमध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावणं सध्या शक्य होणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

नोरा सध्या एका डान्स रीयालिटि शोमध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. तिच्या खास डान्स मुव्ह आणि तिच्या बोल्ड अंदाजासाठी ती सर्वात जास्त लोकप्रिय आहे. नोरा एक उत्तम बेली डान्सरही आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगण यांच्या ‘थॅंक गॉड’ या चित्रपटातही नोरा झळकणार आहे. यामध्ये ती ‘मणिके मागे’ या लोकप्रिय गाण्यावर थीरकताना दिसणार आहे. या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे.

Story img Loader