‘ऑक्टोबर’ चित्रपटातून अभिनेत्री बनिता संधूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ऑक्टोबर चित्रपटातील अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्याच सिनेमात तिला दिग्दर्शक शुजित सरकार आणि वरुण धवनसारख्या बिग स्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर बनिताने दक्षिणेकडील सिनेमात आणि काही ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले. मात्र, तिने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले नाही.
बनिता संधूने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना बॉलीवूडपासून दूर राहण्याचे कारण सांगितले आहे. बनिता ही कमल मुसळे दिग्दर्शित ‘मदर तेरेसा आणि मी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. बनिता यामध्ये ‘कविता’ नावाचे महत्त्वाचे पात्र साकारणार असल्याने ती सध्या या चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा : ‘खतरों के खिलाडी’मध्ये शिझान खानची एन्ट्री; तुनिषाची आई संतापली म्हणाली, “लोक गुन्हे करतात आणि…”
‘मदर तेरेसा आणि मी’ या चित्रपटातील ‘कविता’ पात्राच्या भूमिकेबद्दल सांगताना बनिता म्हणाली, मी या पात्राशी संपूर्णपणे रिलेट करते. कविता ही तरूण मुलगी असून ती स्वत:च्या आयुष्यात खूप हरवलेली आहे. तिला आयुष्यात नेमके काय हवे आहे हे तिला खरोखरचं समजत नाही. या समस्येला तोंड देण्याऐवजी ती भारतातून पळून जाण्याचा निर्णय घेते. आजची तरुणपिढी या घटनेला पूर्ण रिलेट करू शकते. या ‘कविता’ नामक पात्राची मला एक गोष्ट फार आवडते ती म्हणजे, मदर तेरेसांच्या माध्यमातून तिने तिचे चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि स्वतःशी असलेले नाते विकसित केले, हे पात्र माझ्यासारखेच आहे.
हेही वाचा : १५ वर्षांनंतर ‘गजनी’च्या सिक्वेलसाठी आमिरची तयारी? अल्लू अर्जुनशी आहे खास कनेक्शन
दरम्यान, पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता वयाच्या ११ व्या वर्षापासून अभिनय करते. लंडनमध्ये राहिल्याने तिला सुरूवातीला हिंदी बोलण्यात असंख्य अडचणी येत होत्या यासाठी तिने हिंदीचे क्लासही लावले होते.