Abhishek Bachchan Video: अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा काही महिन्यांपासून होत आहेत. ऐश्वर्या व अभिषेक वेगळे झाल्याचं म्हटलं जातंय. अभिषेकचं एका बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर आहे, त्यामुळे त्याच्या व ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आला, अशा पोस्टही व्हायरल होत आहेत. याच दरम्यान त्याचा एक व्हिडीओ चर्चेत आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. तो बाहेर जात असताना पापाराझी त्याचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी पाठलाग करत होते. मात्र पापाराझी बराच वेळ शूट करत होते, त्यामुळे त्याने त्यांना थेट हात जोडले. यावेळी अभिषेकबरोबर त्याचा मित्र आणि निर्माता बंटी वालिया होता.
‘वूम्प्ला’ या पापाराझी अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये, निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि बेज पँट घातलेला अभिषेक विमानतळाबाहेर पडताना दिसत आहे. त्याचा मित्र बंटी वालिया आणि त्याचा मुलगा त्याच्याबरोबर फिरताना दिसत आहेत. पापाराझी अभिषेकला कारपर्यंत फॉलो करतात, त्यामुळे वैतागलेला अभिषेक हात जोडून “बस भैया अभी हो गया, थँक्यू” असं म्हणतो.
अभिषेक बच्चन पापाराझींना पोज देण्यासाठी थांबला नाही. तो तसाच कारमध्ये बसून निघून गेला. यापूर्वी तो त्याची आई जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन यांच्याबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. तेव्हाही तो पापाराझींना पोज देण्यासाठी थांबला नव्हता आणि हात जोडून निघून गेला होता.
हेही वाचा – बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक
अभिषेक बच्चनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झाल्यास तो लंडनमध्ये ‘हाऊसफुल 5’ चं शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, अनिल कपूर, नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि चंकी पांडे यांच्याही भूमिका आहेत. तसेच अभिषेक शाहरुख खानच्या ‘किंग’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखची लेक सुहानादेखील आहे.
© IE Online Media Services (P) Ltd