सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची घोषणेपासून चर्चा होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सलमानचा लूकही समोर आला होता. आता या चित्रपटातील नव बथुकम्मा हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
हेही वाचा- ‘त्या’ गोष्टीवर नाराज होत शाहरुख खानने अनुराग कश्यपला चांगलच खडसावलं; फोन करत म्हणाला..
‘बथुकम्मा’ या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. या गाण्यातील सलमान खानचा लुक खूपच हटके आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातील ‘नय्यो लगदा’, ‘बिल्ली बिल्ली’ आणि ‘जी रहे थे हम’ ही गाणी या अगोदर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता ‘बथुकम्मा’ हे चौथं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘बथुकम्मा’ या गाण्यात सलमान खान साऊथ इंडियन लुकमध्ये दिसत आहे. सलमानने सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. “बथुकम्मा गाणं आऊट” अस कॅपश्न त्याने व्हिडिओला दिलं आहे. या गाण्यात सलमानसह पूजा हेगडेदेखील दिसत आहे.
हेही वाचा- ‘हेरा फेरी’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी सुरुवातीला फिरवलेली पाठ पण… जाणून घ्या नेमकं काय घडलं?
बिल्ली बिल्ली’ गाण्यावरुन सलमान ट्रोल
या अगोदर या चित्रपटातील ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं सुखबीरने गायलं असून संगीत देखील त्याचंच आहे. तर या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहे. सलमानने या गाण्याचा एक टीझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. टीझरमध्ये हे गाणं चाहत्यांना आवडलं होतं. पण संपूर्ण गाणं समोर आल्यावर चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांनी आता या गाण्याला आणि सलमानला ट्रोल करायला सुरुवात केली होती.
‘किसी की भाई किसी की जान’मध्ये सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.