News : ‘द केरळ स्टोरी’चा वाद सुरू असतानाच आता कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये टिपू सुलतानची एन्ट्री झाली आहे. कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये आगामी ‘टिपू’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चांगलेच वातावरण तापले आहे. नुकतेच ‘टिपू’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. टिपू सुलतानबद्दल आजवर आपल्याला जे सांगण्यात आले आहे, त्याच्या बरोबर उलट चित्र आपल्याला यात बघायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये टिपू सुलतानने आजवर किती मंदिरे उद्ध्वस्त केली, किती लोकांचे धर्मांतरण केले, किती लोकांवर अन्याय केला हे सगळे दिसत आहे तर पोस्टरच्या शेवटी येणाऱ्या टिपू सुलतानच्या चेहऱ्यावर आपल्याला काळे फासल्याचे बघायला मिळत आहे. साहजिक आहे की जे इतिहासात टिपू सुलतानबद्दल मांडले गेले आहे त्याच्या विरुद्ध इतिहास आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : मोडलेला साखरपुडा, प्रायव्हेट फोटो लीक, विवाहित व्यक्तीसह अफेअर; ‘PS-2’ स्टार त्रिशा कृष्णनचे खासगी आयुष्यही आहे फिल्मी

भाजपाचे ईशान्य भारतातील मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, प्रसिद्ध लेखक आणि सूत्रसंचालक रजत सेठी यांनी ह्या चित्रपटासाठी संशोधन केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पवन शर्मा यांनी केले आहे. याबद्दल बोलताना पवन म्हणाले, “आपल्याला आजवर पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानबद्दल सगळी चुकीची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा टिपूबद्दल काही भयानक गोष्टी माझ्यासमोर आल्या तेव्हा मला खूप मोठा धक्काच बसला. या चित्रपटाच्या माध्यमातून ते भयावह सत्य उघडकीस आणणार आहे, जे इतक्या दिवसांपासून आपल्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. टिपू हा त्याच्या वडिलांपेक्षा क्रूर होता. तो त्या काळातील हिटलरच होता.”

रश्मि शर्मा आणि संदीप सिंह यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संदीप सिंह याविषयी म्हणाले, “हा असा सिनेमा आहे ज्यावर माझा वैयक्तिक विश्वास आहे. माझे चित्रपट कायम सत्यच लोकांसमोर मांडतात. टिपूची प्रतिमा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एका शूरवीराची आहे अन् हेच आपल्या मनावर बिंबवले गेले आहे. पण त्याची दुष्ट बाजू कोणालाच माहीत नाही. त्याची ही भयानक बाजू मला भावी पिढीसमोर उलगडून दाखवायची आहे.” हा चित्रपट हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगू अन् मल्याळम् भाषेत प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before karnataka polls poster of upcoming movie tipu launched avn