९० च्या दशकात चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रविना टंडन आजही चांगलीच चर्चेत असते. ९० च्या दशकातील काही ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये रविनाचं नाव घेतलं जायचं. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रविनाने उत्तम काम करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे. चित्रपटातील रवीनाच्या बोल्ड आणि हॉट इमेजचे लोक आजही चाहते आहेत.

‘मोहरा’ चित्रपटातील रवीना अक्षय कुमारवर चित्रित झालेलं गाणं हे आजही लोकांचं प्रचंड आवडतं आहे. या गाण्याची बरीच रिमेक गाणी आली तरी रवीना आणि अक्षयच्या केमिस्ट्रीची चर्चा आजही होते. तुम्हाला माहितीये का पण या गाण्यासाठी रवीना टंडनची निवड झालेली नव्हती. केवळ हे गाणंच नव्हे तर या ‘मोहरा’ चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंत रवीना नव्हतीच.

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

आणखी वाचा : “मला अनुष्काचं करीअर…” खुद्द करण जोहरने दिलेली ‘या’ गोष्टीची कबुली

‘मोहरा’ चित्रपटात अक्षय कुमारच्या समोर रवीना ऐवजी दिव्या भारतीला घेतलं होतं. हा चित्रपट साईन केल्यानंतर ५ दिवस दिव्या भारतीने यासाठी चित्रीकरणही केलं, पण नंतर दिव्या भारतीचा अचानक संशयास्पद मृत्यू झाल्याने तिच्याऐवजी रवीना टंडनची वर्णी लागली. दिव्या भारतीचा मृत्यू झाला नसता तर ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्यात त्या हॉट आणि मादक अवतारात रवीना टंडन ऐवजी दिव्या भारती थिरकताना दिसली असती.

आणखी वाचा : “… म्हणून त्या कुटुंबाने नाटक अर्धवट सोडलं” प्रशांत दामलेंनी शेअर केलेला ‘तो’ अनुभव

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर जेव्हा रवीना टंडनला या चित्रपटासाठी विचारणा झाली तेव्हा पहिले रवीना या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्यासाठी तयार नव्हती. हा चित्रपट चांगला होता पण त्या गाण्यातील काही सीन्ससाठी ती तयार नव्हती. अखेर दिग्दर्शक राजीव राय यांना रवीनाचं मन वळवण्यात यश आलं अन् रवीनाने या चित्रपटासाठी होकार दिला. पुढे या चित्रपटाने आणि खासकरून ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याने इतिहास रचला.