२ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता आज प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. आता या चित्रपटातील एक सीन लीक झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं असून या चित्रपटातील सनी ची पहिली झलक काय दिवसांपूर्वी समोर आली होती. ‘झी स्टुडिओज’च्या एका व्हिडीओमध्ये तो बैलगाडीचा चाक उचलताना दिसला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो हातात मोठा हातोडा घेऊन उभा दिसला. त्या पाठोपाठ आता या चित्रपटातील एक ॲक्शन सीनचा बिहाइंड द सीन व्हिडीओ आऊट झाला आहे.

आणखी वाचा : याला म्हणतात स्वॅग! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’ भारतीय अभिनेता

यात सनी म्हणजेच तारा सिंग आणि अभिनेत्री सिमरत कौर दोन सिमेंटच्या खांबांना बांधलेले दिसत आहेत. त्यांच्यासह बाजूला पोलीस बंदूक घेऊन उभे आहेत. अशातच सनीचा राग अनावर होतो आणि त्याला ज्या खांबाला बांधलेला आहे तो खांब उखडतो. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर असलेल्या नायिकेलाही वाचवतो. यावेळी सनीने पठाणी सूट आणि डोक्यावर पगडी असा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. त्याच्या व्हायरल झालेला व्हिडीओमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसत आहे.

हेही वाचा : Video: आधी हातपंप, आता थेट बैलगाडीचं चाक; ‘गदर २’ चित्रपटातील सनी देओलचा जबरदस्त लूक बघाच

२००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Behind the scene video of sunny deol starrer gadar 2 film got viral rnv