Sachet Parampara Baby Boy: लोकप्रिय गायक संगीतकार जोडी सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांनी चाहत्यांशी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. परंपरा व सचेत आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या सदस्यांचं आगमन झालं आहे. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून बाळाच्या जन्माची माहिती दिली आहे.
सचेत व परंपरा २०१६ पासून एकत्र आहेत. त्यांनी अनेक गाणी एकत्र गायली. पण त्यांना ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील ‘बेखयाली’ या सुपरहिट गाण्यानंतर खूप लोकप्रियता मिळाली. या दोघांनी २०२० मध्ये खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर चार वर्षांनी आता ते एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आहेत. परंपराने मुलाला जन्म दिला आहे.
हेही वाचा – खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
सचेतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या गोंडस बाळाची पहिली झलक दाखवली आहे. दोघांनी बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. पण त्याच्याबरोबरच्या काही फोटोंचा एक सुंदर व्हिडीओ तयार करून तो शेअर केला आहे. “महादेवाच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या मुलाच्या आगमनाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे,” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. तसेच या सुंदर क्षणी चाहत्यांनी बाळाला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्या, असं म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ –
सचेत व परंपराने गुड न्यूज शेअर केल्यावर चाहते आणि इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी या दोघांना शुभेच्छा देत आहेत. आकृती कक्कर, हर्षदीप कौरसह अनेकांनी या दोघांचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट
सचेत व परंपरा दोघेही ‘द व्हॉईस इंडिया’च्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. दोघेही शोच्या फिनालेमध्ये पोहोचले होते, पण शो जिंकू शकले नाहीत. हा शो संपल्यानंतर दोघांनी इंडस्ट्रीत कामाचा शोध घेतला पण त्यांना सगळीकडून नकार मिळाला. यानंतर दोघांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागला आणि त्यांना काम मिळू लागलं. ‘कबीर सिंग’बरोबरच या जोडप्याने ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ आणि ‘पल पल दिल के पास’ सारख्या चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे.
सचेत व परंपरा एकत्र काम करतानाच प्रेमात पडले आणि त्यांनी साखरपुडा केला. नंतर २७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी खासगी सोहळ्यात लग्न केलं. लग्नानंतर ४ वर्षांनी ते आई-बाबा झाले आहेत.