बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अशात आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.
शाहरुख खान आणि दीपिकाची मुख्य भूमिका असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात एकीकडे शाहरुख खानचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एवढ्या बोल्ड अवतारात दिसत असून या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याआधी दीपिकाचा या गाण्यातील बिकिनी लूकही चर्चेत आला होता.
आणखी वाचा- Video: मलायकाशी बाचाबाची; नोरा फतेहीने रागाच्या भरात सोडला शो, पाहा नेमकं काय घडलं?
गाण्याच्या सुरुवातीला दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. ‘हमें तो लूट लिया मिलके इश्क वालों ने..’ अशा गाण्याच्या ओळी आहेत. या गाण्याचं पोस्टर शाहरुख खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. हे गाणं शिल्पा राव, विशाल शेखर आणि कॅरालिसा मोंटेरियो यांनी गायलं आहे. गाण्याचं लेखन विशाल ददलानी यांनी केलं आहे. तर संगीत विशाल-शेखर यांचं आहे. याशिवाय कोरिओग्राफी वैभवी मर्चंटची आहे.
आणखी वाचा- शाहरुख खानचा नवा ‘पठाण’लूक चांगलाच चर्चेत; नेटकरी म्हणाले, “हे बेकायदेशीर…”
दरम्यान ‘पठाण’ चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर यशराज बॅनर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.