गेली अनेक दशकं बॉलीवूड अभिनेते मनोज बाजपेयी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आता लवकरच त्यांचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज बाजपेयींच्या बॉलीवूड कारकीर्दीमधील हा १०० वा सिनेमा असणार आहे. त्यांच्या बहुचर्चित ‘भैय्याजी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भैय्याजी’च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हा ‘भैय्याजी’ नेमका आहे तरी कोण? हे सांगत असतो. यानंतर मग ट्रेलरमध्ये मनोज बाजपेयींची एन्ट्री होती. या चित्रपटाचं संपूर्ण कथानक बिहारमधील एका गावाभोवती फिरतं. अपूर्व सिंग कार्की यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मनोज बाजपेयी आपल्या कुटुंबाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सज्ज झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा : Video : गुलाबी रंगाचा ड्रेस, टिकली, मोत्याची माळ अन्…; प्रसाद ओकच्या लाडक्या श्वानाचा वाढदिवसानिमित्त खास लूक

भैय्याजीची ओळख करून देताना एक व्यक्ती ट्रेलरमध्ये सांगते, “भैय्याजी हे मास्टरमाईंड आहेत जे सरकार पाडून त्याच्याजागी विरोधकांना सत्तेवर आणून राजकारण पूर्णपणे फिरवू शकतात. त्यांनी अनेक पापी लोकांना शिक्षा केली आहे.” “भैय्याजी रॉबिन हूड आहेत का?” असं विचारताच हा मनुष्य सांगतो, “आमचे भैय्याजी रॉबिन हूडचे पण बाबा आहेत.”

बाजपेयींसाठी हा सिनेमा अत्यंत खास आहे कारण हा त्यांचा १०० वा सिनेमा आहे. या सिनेमाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे भैय्याजी चित्रपटाची निर्मिती त्यांच्या पत्नी करत आहेत. सुविंदर पाल विकीने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा : Video : अखेर भारतात परतली मुक्ता बर्वे! विमानतळावर ‘नाच गं घुमा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, मैत्रिणींना भेटून झाली भावुक

भैय्याजी हा मनोज बाजपेयी यांच्या करिअरमधील १०० वा चित्रपट आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली मॅन’ आणि ‘सिर्फ एक बंदा ही काफी है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी तुलनेने काहीशा सॉफ्ट भूमिका साकारल्या होत्या. परंतु, भैय्याजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांना नक्कीच ‘गँग्स ऑफ वासेपूर’ची आठवण येते. चित्रपटात बायपेयींबरोबर विपिन शर्मा, झोया हुसैन आणि जतिन गोस्वामी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, समिक्षा ओसवाल, शैल ओसवाल, शबाना रझा बाजपेयी आणि विक्रम खाखर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दरम्यान, येत्या काळात मनोज बाजपेयी ‘द फेबल’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. यामध्ये हिरल सिद्धू, प्रियंका बोस, तिलोतमा शोम, अवन पूकोट आणि दीपक डोबरियाल एकत्र झळकणार आहेत.