बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांच्या ‘भेडिया’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाबाबत खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याशिवाय या ट्रेलरवर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण सध्या चर्चा आहे ती दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने या ट्रेलरवर दिलेल्या प्रतिक्रियेची. प्रभासने या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘भेडिया’ ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. अशात प्रभासने या चित्रपटाला शुभेच्छा दिल्याने तो चर्चेत आला आहे. मागच्या काही काळापासून प्रभास आणि क्रिती सेनॉन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच प्रभासने क्रितीच्या आगमी चित्रपटाचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर करत एक खास पोस्टही लिहिली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा- हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त मिलाप, ‘भेडिया’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणार ट्रेलर प्रदर्शित

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्याने ट्रेलरवर कमेंट करताना लिहिलं, “ट्रेलर खूपच दमदार आहे. संपूर्ण टीमसह वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांना शुभेच्छा” प्रभासची ही इन्स्टाग्राम स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना क्रितीने प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलं, “प्रभास तू खूपच प्रेमळ आहे. धन्यवाद” या पोस्टमध्ये तिने हार्ट इमोजीचा आणि स्माइलचा वापर केला आहे.

prabhas on bhediya trailer

दरम्यान प्रभास आणि क्रिती सेनॉन लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर क्रिती सेनॉन ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये हजेरी लावली होती त्यावेळी तिने एका गेम राउंडमध्ये प्रभासला फोन लावला होता. त्यावेळी प्रभासने तिला ज्या पद्धतीने ग्रीट केलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अद्याप या दोघांनीही त्यांच्या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Story img Loader