.Bholaa Box Office Collection Day 8 : अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘भोला’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर होईल की नाही, अशी चर्चा होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत घट नोंदवण्यात आली होती. आता चित्रपटाच्या आठव्या दिवशीही कमाईत घट कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अजय देवगणचा हा बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांवर जादू करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.
हेही वाचा- “त्या चित्रपटानंतर लोक मला…”; विद्या बालनने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा, म्हणाली..
‘भोला’च्या कमाईत घसरण
‘भोला’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत घट नोंदवण्यात आली होती. चित्रपटाने पाचव्या दिवशी ५० कोटींचा आकडा पार केला होता. ‘भोला’ चित्रपट रिलीज होऊन ८ दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप हा चित्रपट म्हणावी तशी कमाई करू शकलेला नाही. चित्रपटाच्या आठव्या दिवशी (गुरुवारी) ‘भोला’च्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी चित्रपटाने केवळ २.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आत्तापर्यंत ‘भोला’ने ५९.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हेही वाचा- सुनील शेट्टीने जावई केएल राहुलच्या खराब कामगिरीबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मी त्याला क्रिकेट…”
विकेंडला चित्रपटाच्या कमाईत भर पडण्याची शक्यता
‘भोला’चे बजेट १२५ कोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या चित्रपटाने अधिक कमाई करणे अपेक्षित आहे. ‘गुड फ्रायडे’ची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या वीकेंडमुळे चित्रपटाच्या कमाईत भर पडेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. ‘भोला’मध्ये अजय देवगण, तब्बू, दीपक डोबरियाल, गजराज राव, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.