Bholaa Box Office Collection Day 2: अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘दृश्यम २ ‘च्या यशानंतर पुन्हा एकदा अजयच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. ‘भोला’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर होईल की नाही, अशी चर्चा होती. अशातच पहिल्या दिवशी चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनची आकडेवारीही समोर आली आहे.
‘भोला’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसच्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी १०.५० कोटींची कमाई करणाऱ्या ‘भोला’ची दुसऱ्या दिवसाची कमाई मात्र ३० ते ४० टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळाली. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ७ कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांच्या एकूण कमाईनंतर चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १८ कोटी रुपयांच्या आसपास झाले आहे. मात्र, वीकेंडला हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अजय देवगणच्या ‘भोला’चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
‘भोला’च्या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याचे ‘पान दुकनिया’ हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे, या गाण्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई बघता वीकेंडला चित्रपट चांगलं प्रदर्शन करेल, असं दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या आकड्यांमध्ये वाढ दिसायला मिळू शकते.