बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणचा भोला चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे. शनिवारी या चित्रपटाने ४.२५ कोटींची कमाई केली. त्याआधी शुक्रवारी ३.६० कोटींची कमाई केली होती. भोला या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ५९.६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून १०व्या दिवसापर्यंत एकूण ६७.५३ कोटींची कमाई केली आहे.
‘भोला’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत घट नोंदवण्यात आली होती. चित्रपटाने पाचव्या दिवशी ५० कोटींचा आकडा पार केला होता. ‘भोला’ चित्रपट रिलीज होऊन १० दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप हा चित्रपट म्हणावी तशी कमाई करू शकलेला नाही. चित्रपटाच्या आठव्या दिवशी (गुरुवारी) ‘भोला’च्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी चित्रपटाने केवळ २.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. आत्तापर्यंत ‘भोला’ने ५९.३० कोटी रुपयांची कमाई केली होती.
हेही वाचा- “त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि…” शेफाली शाहने सांगितला धक्कादायक अनुभव
‘भोला’चे बजेट १२५ कोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या चित्रपटाने अधिक कमाई करणे अपेक्षित आहे. ‘गुड फ्रायडे’ची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या वीकेंडमुळे चित्रपटाच्या कमाईत पडली. लवकरच हा चित्रपट १०० कोटींची कमाई करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. भोला’मध्ये अजय देवगण, तब्बू, दीपक डोबरियाल, गजराज राव, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.