Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 1 : दिवाळीच्या दिवशी सिनेमागृहांमध्ये कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षीत ‘भूल भुलैया ३’ चित्रपट शुक्रवारी (१ नोव्हेंबरला) प्रदर्शित झाला. ‘भूल भुलैया २’ च्या तुफान यशानंतर तिसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. अखेर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.

‘भूल भुलैया ३’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग केली आहे. ‘भूल भुलैया ३’ हा कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाशी क्लॅश होऊनही या चित्रपटाने खूप चांगली कमाई केली आहे.

हेही वाचा – दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या डेटानुसार, ‘भूल भुलैया 3’ ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १९.२२ कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमा ३५.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करत हा कार्तिक आर्यनच्या करिअरमधील हायेस्ट ओपनर ठरला आहे. आधी हा रेकॉर्ड कार्तिकच्या ‘भूल भुलैया २’ च्या नावावर होता. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४.११ कोटी रुपयांची ओपनिंग केली होती.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

‘भूल भुलैया 3’ vs ‘सिंघम अगेन’

कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ बरोबरच अजय देवगण स्टारर ‘सिंघम अगेन’ही याच दिवशी रिलीज झाला. ‘सिंघम अगेन’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘भूल भुलैया 3’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३५.५० कोटींची कमाई केली, तर अजय देवगणच्या चित्रपटाने ४३.५० कोटींची ओपनिंग केली आहे. ‘भूल भुलैया ३’चे कलेक्शन ‘सिंघम अगेन’पेक्षा कमी असले तरी कार्तिकच्या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे.

हेही वाचा – ‘या’ देशाने ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’च्या प्रदर्शनावर घातली बंदी, कारणं नेमकी काय? वाचा

‘भूल भुलैया ३’ मध्ये कलाकारांची मांदियाळी

‘भूल भुलैया ३’ हा २००७ मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटाचा तिसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. २०२२ मध्ये आलेल्या सीक्वेलमध्ये कार्तिक आर्यनने अक्षयची जागा घेतली. अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया ३’ मध्ये कार्तिकने रूह बाबा बनून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. दुसऱ्या भागाच्या यशानंतर तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. तिसऱ्या भागात तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि राजपाल यादव हे कलाकार आहेत.