दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेन’ या बहुचर्चित चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील टक्करने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या ओपनिंग वीकेंडमध्ये चांगली कमाई केली आहे. मात्र, ‘भूल भुलैया ३’ चे निर्माता भूषण कुमार यांनी ही टक्कर टाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुमार यांच्या मते, दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी याबाबत चर्चा देखील केली होती, पण आधीच केलेल्या करारांमुळे आणि क्रिएटिव्ह मर्यादांमुळे ही टक्कर टाळता आली नाही.

हेही वाचा…मराठी लेखकाने लिहिलीये Singham Again ची कथा! वीकेंडची कमाई पाहून म्हणाला, “रोहित शेट्टी सर…”

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि करार

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत भूषण कुमार (Bhushan Kumar) म्हणाले, “फ्रँचायझीला खूप महत्त्व असतं आणि आम्हाला दोघांनाही याची पूर्ण जाणीव होती. असं नाही की आम्ही टक्कर टाळण्याचा प्रयत्न केला नाही, पण आमच्याकडे काही अशा जबाबदाऱ्या होत्या ज्या टाळता येणं शक्य नव्हतं. उदाहरणार्थ, ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबर सिनेमा यायच्या आधीच करार केलेले असतात आणि त्यामुळे पुन्हा वेळापत्रक बदलण्याची परवानगी नसते. हा आमचा नाईलाज होता आणि त्यांच्याकडेही अशीच परिस्थिती होती.”

‘सिंघम अगेन’च्या दिग्दर्शकांनी त्यांचा सिनेमा दिवाळीमध्येच प्रदर्शित व्हावा यासाठी काही कारणे दिली, त्याबाबत भूषण कुमार यांनी सांगितलं. “त्यांचा चित्रपट रामायणाच्या थीमवर आधारित होता, त्यामुळे त्यांना दिवाळीला प्रदर्शित करायचा होता. आम्हा दोघांकडेही दुसरा पर्याय नव्हता. आम्ही भेटून चर्चा केली, पण या कारणांमुळे आम्ही टक्कर टाळू शकलो नाही. आता या टक्करमुळे जे नुकसान होईल, ते आम्हा दोघांनाही सहन करावं लागेल, पण मला आनंद आहे की दोन्ही चित्रपट चांगले चालत आहेत.”

हेही वाचा…कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”

सणासुदीच्या काळात दोन सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे नफा वाटला जातो, हे कुमार यांनी मान्य केलं. तसेच ‘भूल भुलैया ३’च्या चांगल्या ओपनिंग वीकेंडमुळे आम्ही आनंदित आहोत, असंही ते म्हणाले.

थिएटर स्क्रीनवरून झाला होता वाद

‘भूल भुलैय्या ३’ (Bhool Bhulaiyaa 3) आणि ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटांच्या निर्मात्यांमध्ये स्क्रीनच्या वाटपावरूनदेखील वाद झाला होता. भूषण कुमार यांच्या टी-सिरीज निर्मिती संस्थेने रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’च्या टीमवर स्क्रीनच्या वाटपात भेदभाव केल्याचा आरोप केला होता. त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाकडे (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ) तक्रार करून थिएटर स्क्रीनचे ५०-५० टक्के समान वाटप करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा…श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन

‘भूल भुलैया ३’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

शुक्रवारी दिवाळीच्या सुट्टीत ‘सिंघम अगेन’बरोबर रिलीज झालेल्या ‘भूल भुलैया ३’ ने पहिल्या दिवशी ३६.६ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी कलेक्शन वाढत ३८.४ कोटी आणि ३५.२ कोटीवर पोहोचले. मात्र, सोमवारी ५० टक्के घट झाली आणि १९.२ कोटींची कमाई झाली. त्यामुळे ‘भूल भुलैया ३’ची भारतातील एकूण कमाई १२९.४ कोटींवर पोहोचली आहे.

हेही वाचा…नोरा फतेहीने आयटम साँगसाठी लहान ब्लाउज घालण्यास दिला होता नकार; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “मला मादक…”

‘सिंघम अगेन’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘सिंघम अगेन’ने ‘भूल भुलैया ३’च्या आधी ४३.५ कोटी रुपयांच्या कमाईसह जोरदार सुरुवात केली. मात्र, पुढील दिवसांत कलेक्शन कमी होत, शनिवारी ४२.५ कोटी आणि रविवारी ३५.७५ कोटींवर आले. ‘भूल भुलैया ३’प्रमाणेच सोमवारी ‘सिंघम अगेन’लाही ५० टक्के घट सहन करावी लागली, आणि फक्त १८ कोटींची कमाई झाली. यासह ‘सिंघम अगेन’ची भारतातील एकूण कमाई १३९.७५ कोटी रुपये झाली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhool bhulaiyaa 3 producer bhushan kumar attempts to avoid clash with singham again in meeting with ajay devgn psg