Bhool Bhulaiyaa 3 teaser : अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैया’ २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली होती आणि यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, दुसऱ्या भागात अक्षय कुमार नसून कार्तिक आर्यनल आहे हे समजल्यावर कार्तिकला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र २०२२ साली ‘भूल भुलैय्या ‘२ आल्यांनतर कार्तिकच्या कामाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८५ कोटी रुपयांची मोठी कमाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता या चित्रपटाचा तिसरा भाग येत असून, त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आर्यनबरोबर विद्या बालनचीही झलक दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा…“मी ‘तुंबाड’साठी सात वर्षं दिली”, अभिनेता सोहम शाहचे वक्तव्य; आमिर खानचा उल्लेख करत म्हणाला, “माझं वय वाढत होतं; पण…”

विद्याचं पुनरागमन आणि पहिल्या भागाची आठवण

टीझरची सुरुवात ‘अमी जे तुमार’ या गाण्याने होते आणि त्याबरोबरच विद्या बालनच्या पुनरागमनाची झलक आपल्याला दिसते. यावेळी ती एक जड खुर्ची उचलताना दिसत असून जोरात किंचाळताना दिसते. हा सीन पाहून ‘भूल भुलैय्या’च्या पहिल्या भागातील त्या भयानक सीनची आठवण होते, त्या सीनमध्ये विद्या बालनच्या पात्राने एका हाताने पलंग उचलला होता.

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रुह बाबा’ या भूत पकडणाऱ्या पात्राच्या भूमिकेत परतला आहे. त्याला मंजुलिकाच्या आत्म्याला पकडण्याचं काम दिलं जातं. या भागात तृप्ती डिमरी कार्तिकच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा भाग असल्याच्या अफवा होत्या, परंतु टीझरमध्ये तिची झलक दिसत नाही.

हेही वाचा…“मी सारा व इब्राहिमची आई…”, करीना कपूरचं वक्तव्य; सैफ चारही मुलांसाठी कसा वेळ काढतो? म्हणाली…

‘भूल भुलैया ३’मध्ये भयपटाची झलक

आकाश कौशिक याने या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. टीझरवरून स्पष्ट होतं की, ‘भूल भुलैया ३’ विनोदापेक्षा भयपटाकडे अधिक झुकतो. ‘स्त्री २’च्या यशामुळे प्रेक्षकांमध्ये या प्रकारातील चित्रपटांबद्दल रस वाढला आहे.

हेही वाचा…“तो खूप विचित्र…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली, “मुंबई पुणे प्रवासात त्यानेच…”

‘सिंघम अगेन’ बरोबर होणार मोठी टक्कर

‘भूल भुलैया ३’ची रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ बरोबर मोठी टक्कर होणार आहे. हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून ‘सिंघम अगेन’मध्ये ‘सिंघम’, ‘सिम्बा’, आणि ‘सूर्यवंशी’मधील सर्व मोठे कलाकार एकत्र येणार आहेत. यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ यांसारखे मोठे कलाकार सहभागी आहेत. ‘भूल भुलैया ३’ १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhool bhulaiyaa 3 teaser vidya balan return and kartik aaryan horror comedy psg