भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील एक बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती नेहमी तिला समाजातल्या खटकणाऱ्या गोष्टींवर भाष्य करताना दिसते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही ती बऱ्याचदा चर्चेत असते. तिच्या लूकचं नेहमी कौतुक केलं जातं. पण आता एका पार्टीत तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला टीकेचा सामना करावा लागत आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : Video : “आता खूप झालं…” अयान मुखर्जीवर वैतागला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल

नुकतेच सोनम कपूरने तिच्या घरी दिवाळीनिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता पार्टीत भूमी पेडणेकरलाही बोलावलं होतं. पण या पार्टीला भूमी ज्या कपड्यांमध्ये गेली ते पाहून नेटकरी तिला खूप ट्रोल करत करत आहेत. तसेच तिचा हा ड्रेसिंग उर्फी जावेदच्या ड्रेसिंग स्टाइल सारख्या असल्याचे नेटकरी सांगत आहेत.

सोशल मीडियावर भूमीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भूमी पांढऱ्या रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. या पार्टीला तिने इंडो वेस्टर्न लूक करण्याचा प्रयत्न केला, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही भूमीची ही स्टाइल नक्की काय आहे हे कोणाला कळले नाही. त्यामुळे तिच्या त्या ड्रेसवर अनेकांनांनी विविध प्रश्न उपस्थित गेले. तसेच अनेकांनी यावरून तिला ट्रोल केले आहे.

हेही वाचा : Photos: आगामी काळ मनोरंजनाचा, ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘या’ बहुचर्चित कलाकृती

व्हिडिओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले की, “हा तर उर्फी जावेदचा प्रभाव आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “उर्फी जावेद विचित्र ड्रेसिंग स्टाइल बॉलिवूडमध्ये घेऊन आली आणि आता सगळेजण तिची स्टाईल फॉलो करत आहे. अजून एक नेटकरी म्हणाला, “दिवाळी सेलिब्रेशनच्या नावाखाली अश्लीलता आणली जात आहे.” भूमीने घातलेला तो पंधरा ड्रेस नेटकऱ्यांना अजिबात आवडलेला दिसत नाहीये.