बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या ‘थॅंक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. भूमीसह या चित्रपटात शहनाझ गिल, शिबानी बेदी, कुशा कपिला या अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान भूमीने बॉडी शेमिंग आणि अलीकडच्या काळात केल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ट्रोलिंगबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

हेही वाचा : “गेल्या ७ वर्षांपासून…”, हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, “राणादा अन् पाठकबाई…”

अभिनेत्री भूमी पेडणेकरने ‘दम लगाके हईशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला वजन वाढवावं लागलं होतं. तिच्या या भूमिकेचं सर्वांनी कौतुक केलं होतं.

अलीकडेच ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना अभिनेत्रीने सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगबद्दल आपलं मत मांडलं. ती म्हणाली, “तुम्ही काहीही केलंत, तरी लोकं तुम्हाला ट्रोल करणारच आहेत. सोशल मीडियावर ट्रोल होणं ही गोष्ट अलीकडच्या जगात खूपच सामान्य झाली आहे. एखाद्या कार्यक्रमातील मी माझा पूर्ण कपड्यांमधील फोटो शेअर केला तरीही, काही लोक मला ट्रोल करतात. याबाबत मी काहीच करू शकत नाही.”

हेही वाचा : “अजिबात टेन्शन नको घेऊस”, ‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला ‘बॉईज ४’च्या सेटवर गौरव मोरेनं केली ‘अशी’ मदत

भूमी पुढे म्हणाली, “आधी फक्त आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्याला ट्रोल करायचे. पण, आता गोष्टी प्रचंड बदलल्या आहेत सोशल मीडियावर सर्रास ट्रोल केलं जातं. तुझं वजन तू कमी कर म्हणजे अधिक छान दिसशील असे सल्ले आपल्याला लहानपणापासून दिले जातात. म्हणजेच घरातूनच वजनाविषयी बोलणं सुरू होतं. याबाबतीत मी शहनाझचं नक्कीच कौतुक करेन कारण, अशा नकारात्मक कमेंट्सवर तिला स्पष्टपणे उत्तर देता येतं.”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

“शहनाझ अनेकदा अशा कमेंट्सवर तिचं मत मांडत उत्तर देते यासाठी तिचं खरंच कौतुक केलं पाहिजे. पण, मी अशी नाहीये…माझ्या आयुष्यात मी ट्रोलर्सला जराही महत्त्व देत नाही आणि भविष्यात देणारही नाही.” असं भूमी पेडणेकरने सांगितलं.