बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. दिग्दर्शक करण बुलानीच्या या सिनेमात चाहत्यांना भूमीचा जबरदस्त बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भूमी पेडणेकरने ‘थँक यू फॉर कमिंग’च्या ट्रेलर लॉंचबद्दल खुलासा केला आहे केला. नुकतंच आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून भूमीने तिच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करण बुलानी दिग्दर्शित ‘थँक यु फॉर कमिंग’ या चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत. यामध्ये भूमी पेडणेकरसह इतर काही लोकप्रिय अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भूमीने प्रेक्षकांची ही उत्सुकता आणखी वाढवली आहे. नुकतंच तिने या चित्रपटातील आपल्या बोल्ड अंदाजातील एक फोटो शेअर करत या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : खिळवून ठेवणारा सस्पेन्स व मर्डर मिस्ट्री; करीना कपूर, जयदीप अहलावत व विजय वर्मा यांच्या ‘जाने जान’चा ट्रेलर प्रदर्शित

बुधवारी म्हणजेच उद्या ६ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजता या ‘थँक यू फॉर कमिंग’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच भूमीने तिचा या चित्रपटातील जबरदस्त बोल्ड लूक शेअर केला आहे त्यामुळे सोशल मीडियावर याची आणखी चर्चा होऊ लागली आहे. मध्यंतरी या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरने सगळीकडे धुमाकूळ घातला होता, आता भूमीचा हा नवा बोल्ड अवतार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

या पोस्टबरोबरच पुढील स्लाईडमध्ये स्त्रिया आणि पुरुषांच्या ऑर्गेझममधील फरक आणि काही भ्रामक कल्पना दूर करायचा हटके प्रयत्नही केला आहे. एकंदर नाव, फर्स्ट लूक आणि पोस्टर्स यावरून हा चित्रपट ‘ऑर्गेझम’ या विषयावर भाष्य करणारा असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. भूमी पेडणेकरचा हा नवीन लूक पाहूनसुद्धा तशीच शक्यता नेटकऱ्यांनी वर्तवली आहे.

भूमी पेडणेकरबरोबरच या चित्रपटात कुशा कपिला, शहनाज गिल, शिबानी बेदी, डॉली सिंग, अनिल कपूर आणि करण कुंद्रा यांसारखे कलाकार दिसणार आहेत. ‘थँक यू फॉर कमिंग’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.