अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘भूल भुलैय्या’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. त्यानंतर १४ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘भूल भुलैया २’ प्रदर्शित झाला. यात कार्तिक आर्यनने प्रमुख भूमिका साकारली होती. ‘भूल भुलैय्या २’ हा कोरोना कालावधी आणि लॉकडाऊन नंतर हिट झालेला पहिला चित्रपट होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे.

‘भूल भुलैय्या २’ चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘भूल भुलैय्या’सारखीच ‘भूल भुलैय्या २’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाचा तिसरा भागही बनवला जाणार असं नुकतंच चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी जाहीर केलं. त्याचप्रमाणे ‘भूल भुलैय्या २’मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेला कार्तिक आर्यनच ‘भूल भुलैय्या ३’मध्ये मुख्य भूमिका साकरताना दिसेल असं समोर आलं आहे.

Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
Fussclass Dabhade Box Office Collection
हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! ३ दिवसांत कमावले तब्बल…; म्हणाला, “तिकीटबारीवर…”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
first class Dabhade team surprised audience with Rs 112 tickets on its release day
पहिल्याच दिवशी ११२ रुपयांत तिकीट; ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची प्रेक्षकांसाठी खास ऑफर
chhaava trailer vicky kaushal in lead role
आग लावणारा ट्रेलर, विकीला यंदा सगळे अवॉर्ड्स…; ‘छावा’च्या ट्रेलरवर कमेंट्सचा पाऊस, मराठी कलाकार काय म्हणाले?

आणखी वाचा : ‘वेड’ची यशस्वी घोडदौड, ‘सैराट’पाठोपाठ मोडला ‘या’ चित्रपटाचा विक्रम

हेही वाचा : कार्तिक आर्यनची ‘हेरा फेरी ३’मधून एग्झिट? ‘या’ कारणाने चित्रपट सोडल्याची चर्चा

निर्माते भूषण कुमार यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं की, “या ‘भूल भुलैय्या ३’ चं शूटिंग २०२४ च्या मध्यात सुरू होईल आणि २०२५ मध्ये हा चित्रपट रिलीज होईल. सध्या आम्ही या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत. ‘भूल भुलैय्या ३’ ची संकल्पना मोठी आणि अनोखी असावी हा आमचा प्रयत्न आहे.” आता ‘भूल भुलैय्या ३’च्या घोषणेनंतर कार्तिकचे चाहते खूप खुश दिसत आहेत.

Story img Loader