बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानने ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये एण्ट्री केली. साजिदचं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जाणं कलाक्षेत्रामधील काही अभिनेत्रींना अजिबात पटलेलं नाही. सतत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात येत आहेत. प्रेक्षकांकडूनही साजिदला घराबाहेर काढा अशी मागणी होत आहे. ‘हॅशटॅग मीटू’ प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या साजिदबाबत अजूनही काही धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. आता भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोजपूरी अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप
‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राणीने साजिदबाबत धक्कादायक खुलासे केले. ती म्हणाली, “‘बिग बॉस’मध्ये साजिद खानला पाहून माझा राग अनावर होतो. ‘मीटू’ प्रकरणानंतर त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. पण ‘बिग बॉस’ साजिदला पाठिंबा का देत आहे हेच कळत नाही. ‘हिम्मतवाला’ चित्रपटादरम्यान मी साजिदच्या टीमशी संपर्क साधला होता. त्यानंतर साजिदने स्वतः मला कॉल करत सांगितलं की मला तुझ्याशी थेट संवाद साधायचा आहे.”

“त्यानंतर साजिदचं व माझं फोनवर बोलणं झालं. तू माझ्या घरी ये तिथेच आपण बोलणं करू असं त्याने मला त्यावेळी फोनवरच सांगितलं. पण तुझ्याबरोबर मॅनेजर किंवा पीआरला घेऊन येऊ नकोस असा सल्लाही मला दिला. आता बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे म्हटल्यावर मी त्याची ही गोष्ट ऐकली. जुहू येथील त्याच्या राहत्या घरी मी पोहोचले. तेव्हा साजिद घरी एकटाच होता. मी तुला ‘धोखा धोखा’ आयटम गाण्यासाठी कास्ट करणार आहे असं त्याने मला सांगितलं. त्यानंतर त्याने मला माझे पाय दाखवण्यास सांगितले. मला वाटलं हा कामाचाच भाग आहे म्हणून मी माझे पाय साजिदला दाखवले.”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “‘बिग बॉस’ मराठीच्या स्पर्धकांना वठणीवर आणणार” महेश मांजरेकरांचा व्हिडीओ व्हायरल

पुढे ती म्हणाली, “तू अजिबात लाजू नकोस. तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? तू कितीवेळा सेक्स करतेस? मी त्याचे हे प्रश्न ऐकले आणि मी म्हटलं, तू हे काय विचित्र प्रश्न विचारत आहेस. मला तिथे अस्वस्थ वाटू लागलं. साजिदला असं वाटलं की मी त्याच्या बाजूने असेन. पण लगेचच मी त्याच्या घरामधून निघाले. इतकंच नव्हे तर त्याने मला वाईट पद्धतीने स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला.” राणीने केलेल्या आरोपांमुळे साजिद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss 16 director sajid khan bhojpuri actress rani chatterjee says he misbehave with me see details kmd