‘बिग बॉस हिंदी १६’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. रॅपर एमसी स्टॅनने शिव ठाकरेला मागे टाकत सर्वाधिक वोट मिळवत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. पहिल्या दिवसापासूनच एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरा होता. हटक्या स्टाइलने त्याने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही भूरळ पाडली. त्याला आता बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे.

देशातील कित्येक कलाकार, सामान्य नागरिकांना या बॉलिवूडची चंदेरी दुनियेची भुरळ पडत असते. एमसी स्टॅननेदेखील बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. “बॉलिवूडमध्ये काम करण्याची आकांशा आहे का?” असे विचारताच तो म्हणाला, “मला बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. पण मला चांगलं काम कसं आणि कधी मिळतं यावर ते अवलंबून असेल. येणारी वेळच हे सांगेल.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

Salman Khan And Hema Sharma
“जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
bigg boss marathi meenal shah built luxurious bungalow in goa
Bigg Boss फेम अभिनेत्रीने गोव्यात बांधला भलामोठा आलिशान बंगला! ‘ड्रीम हाऊस’ म्हणत शेअर केले फोटो; म्हणाली, “हा प्रवास…”
Jahnavi Killekar
बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता का? जान्हवी किल्लेकर म्हणाली, “तसंही महाराष्ट्र मला खलनायिका…”
Suraj Chavan
“बघा माझ्या लेकाने काय केलंय…”, हातात बिग बॉसची ट्रॉफी बघून वडिलांची ‘अशी’ असती प्रतिक्रिया; सूरज चव्हाण म्हणाला…
Suraj Chavan And Jahnavi Killekar
‘बिग बॉस’नंतर सूरजमध्ये काय बदल झाला? जान्हवी किल्लेकर म्हणाली, “तो आता जास्त…”
Bigg Boss 18
Video: ‘बिग बॉस’च्या घरात येताच दिग्विजयने अविनाशला दाखवला आरसा; म्हणाला, “तुला दीड दिवस…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ‘केजीएफ’ स्टार यशची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

कव्वालीचं वेड असलेल्या एमसी स्टॅनने त्याच्या रॅपरमधून प्रेक्षकांना वेड लावतो. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलेला एमसी स्टॅन पुण्यातील रहिवाशी आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे. वयाच्या १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केलं आहे. एमसीने अनेक गाणी गायली असली तरी यूट्यूबवर जवळपास २१ मिलियन व्ह्यूज मिळालेल्या ‘वाटा’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली.

‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी शिव ठाकरे व एमसी स्टॅनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी नावावर केली. एमसी स्टॅनला ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याबरोबरच त्याला ३१ लाख ८० हजार रुपये रक्कम देण्यात आली. एमसी स्टॅनला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली आहे.