‘बिग बॉस १६’मध्ये झळकलेली अभिनेत्री सौंदर्या शर्मा आता अक्षय कुमारबरोबर ‘हाऊसफुल ५’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सौंदर्याला अनेक मोठ्या ऑफर मिळाल्या. एका पान मसालाच्या जाहिरातीत शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्याबरोबर दिसल्यामुळे ती चर्चेत आली होती. आता ‘हाऊसफुल’सारख्या लोकप्रिय चित्रपट मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार असल्यामुळे ती खूपच उत्साही आहे. नुकतंच एका मुलाखतीत या प्रवासावर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘हाऊसफुल ५’चा भाग होण्याचा अनुभव

‘हाऊसफुल ५’चा भाग बनल्यानंतरचा अनुभव सांगताना ती म्हणाली, “मी खूपच आनंदी आहे, हे माझ्यासाठी आशीर्वादासारखं आहे. लहानपणापासून हाऊसफुल सीरिजचे चित्रपट पाहते, त्यावर डान्स करते, आणि आता मीच त्याची लीडिंग लेडी आहे. माझे आई-वडील देखील खूप आनंदी आहेत. मी या चित्रपटाचं सरप्राइज पॅकेज आहे, मी असं नाही फक्त बोलत नाहीये, लोक बघतील आणि त्यांनाही जाणवेल. संपूर्ण अनुभव खूप मजेशीर आणि आनंददायक आहे.”

हेही वाचा…क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न, पण झाला अभिनेता, वडिलांनी बॅटने दिलेला चोप; स्वतःच केला खुलासा

इतक्या मोठ्या ऑफरवर सौंदर्याची प्रतिक्रिया

इतक्या मोठ्या ऑफरचा अनुभव कसा आहे, असा प्रश्न विचारल्यावर सौंदर्याने ‘जनसत्ता’शी बोलताना सांगितलं की, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एवढी मोठी ऑफर कोणालाही मिळाली नसेल, असं मला वाटतं. नाडियाद वाला ग्रँडसन एंटरटेनमेंटसारख्या प्रॉडक्शन हाऊसच्या ए-लिस्टर चित्रपटात मुख्य भूमिकेत असणं हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. मी या संधीबद्दल वर्धा नाडियादवालांची खूप आभारी आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.”

अक्षय कुमारबरोबर कामाचा अनुभव

अक्षय कुमारबरोबर काम करताना तिचा अनुभव कसा होता याबद्दल ती म्हणाली, “अक्षय सर खूप मोठे प्रँकस्टर आहेत, सेटवर मी सर्वात ज्युनिअर असल्यामुळे सर्वांनी माझी गमंत केली. अक्षय सर, रितेश सर, अभिषेक सर सर्वच मस्ती करत होते. हा सेट म्हणजे पिकनिक स्पॉटसारखा होता.”

हेही वाचा…Ghajini 2 : एकच सिनेमा, सारखेच पात्र, पण भूमिका साकारणार दोन अभिनेते; आमिर खान आणि दाक्षिणात्य स्टार ‘गजनी २’मध्ये दिसणार

डेंटिस्ट असून पान मसालाची जाहिरात का केली?

सौंदर्या डेंटिस्ट असूनही पान मसालाच्या जाहिरातीत दिसल्यावर तिला ट्रोल केले गेले, यावर तिचं मत विचारलं असता ती म्हणाली, “आम्ही इथे एक्टर म्हणून कामासाठी आलो आहोत. जे लोक पान मसाला गुटखा खात आहे, त्यांच्यावर कुठलाही अभिनेता बंदूक रोखून त्यांना ते खायला लावत नाही. माझ्या निवडी कलाकार म्हणून वेगळ्या आहेत, त्याचा माझ्या वैयक्तिक मतांवर परिणाम होत नाही. अशी मोठी ऑफर आली असताना, मी नकार का देऊ? शाहरुख, अक्षय आणि अजय सरांसारख्या मेगा स्टार्सबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली असती तर कोणीही वेडाच असेल जो नकार देईल.”

हेही वाचा…New Ott Release : रोमँटिक-थ्रिलर, आणि अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचरची मेजवानी, या वीकेंडला बघा ओटीटीवरील ‘या’ नव्या कलाकृती

सौंदर्या शर्माने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१७ मध्ये ‘रांची डायरीज’ या रोमँटिक ड्रामातून केली होती. २०२२ मध्ये ती ‘बिग बॉस १६’ मध्ये दिसली. आता ती ‘हाऊसफुल ५’ मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चनसह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Story img Loader