‘बिग बॉस ७’ फेम अभिनेता एजाज खानला २०२१ साली ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) मार्च २०२१मध्ये एजाजविरोधात ही कारवाई केली होती. आता दोन वर्ष तुरुंगावास भोगल्यानंतर ड्रग्ज प्रकरणात एजाज खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२मध्ये न्यायालयाने एजाजला जामीन देण्यास नकार दिला होता. या प्रकरणात एजाजचा सहभाग असून ड्रग्ज बाळगणे व त्याची तस्करी केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. आता दोन वर्षांनी एजाजला जामीन मंजूर करण्यात आला असून शुक्रवारी(१९ मार्च) सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास त्याची जामिनावर सुटका करण्यात येणार आहे.
हेही वाचा>> बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर करत मिताली मयेकरची पोस्ट, म्हणाली, “आपली संस्कृती…”
एजाजला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची पत्नी एँड्रिया खानने प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. या काळात आम्हाला त्याची खूप आठवण यायची,” असं एजाजची पत्नी म्हणाली.
हेही वाचा>> ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासाठी अदा शर्माने आकारली मोठी रक्कम, ‘इतक्या’ कोटींचं घेतलं मानधन
नेमकं प्रकरण काय?
२०२१ साली चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना मागणीप्रमाणे अंमलीपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शादाब शेख उर्फ शादाब बटाटा याला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी शादाबची चौकशी केल्यानंतर एजाज खानचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबी पथकाने एजाजला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे अल्प्राझोलमच्या ४.५ ग्रॅमच्या ३१ गोळ्या सापडल्या होत्या. चौकशीनंतर एजाजला अटक करण्यात आली होती.