Genelia Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. यंदाचा सीझन पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे. यापूर्वीचे चार सीझन महेश मांजरेकरांनी होस्ट केले होते. त्यामुळे रितेश यंदाचा सीझन कसा सांभाळणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं. अखेर समोर आलेल्या टीआरपीच्या आकडेवारीनुसार ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनने रेकॉर्डब्रेक टीआरपी आणला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व २८ जुलैपासून सुरू झालेलं आहे. या कार्यक्रमाने तिसऱ्याच आठवड्यात ३.२ TVR एवढा टीआरपी आणला आहे. विशेषत: वीकेंडला म्हणजेच ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्याला यंदा सर्वाधिक टीआरपी मिळत आहे. कार्यक्रमाला हा ऐतिहासिक टीआरपी मिळाल्यानंतर रितेश देशमुखचं त्याची पत्नी जिनिलीयाने तोंडभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “घरात गद्दारी चालणार नाही…”, रितेश देशमुखने वैभवला चांगलंच झापलं; ‘ही’ गोष्ट ठरली कारण, पाहा वीकेंडचा जबरदस्त प्रोमो

जिनिलीयाची रितेशसाठी खास पोस्ट

जिनिलीयाने ‘बिग बॉस मराठी’ने ऐतिहासिक टीआरपी रचल्याची पोस्ट शेअर करत नवऱ्यासाठी खास मेसेज लिहिला आहे. अभिनेत्री ( Genelia Deshmukh ) लिहिते, “मला जेव्हा तू सांगितलंस की, यावर्षी तू ‘बिग बॉस मराठी’चा सीझन होस्ट करणार आहेस… अगदी त्या क्षणाला मला खात्री होती की, हा शो सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करेल. प्रिय नवरोबा मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि तुझं खूप खूप अभिनंदन! ‘बिग बॉस मराठी’ची संपूर्ण टीम, ‘कलर्स मराठी’ वाहिनी तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा! येत्या काळात अशीच प्रगती करत राहा.”

दर वीकेंडला रितेश देशमुख घरात चुकीचं वर्तन करणाऱ्या सदस्यांची शाळा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात निक्की, दुसऱ्या आठवड्यात जान्हवी आणि आता रितेश भाऊच्या धक्क्यावर अरबाज आणि वैभवची शाळा घेणार आहे.

हेही वाचा : “फ्लॉवर नही फायर है…”, बेधडक खेळणाऱ्या योगिताचं नवऱ्याने केलं कौतुक! सौरभ चौघुले घरात Wild Card एन्ट्री घेणार का?

जिनिलीया देशमुखची पोस्ट ( Genelia Deshmukh )

हेही वाचा : Video: Bigg Boss Marathi मध्ये येणार आधीच्या पर्वातील दोन दमदार स्पर्धक, योगिताचा पती म्हणाला, “आता खरा कल्ला होणार…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनकडून प्रत्येकालाच प्रचंड अपेक्षा आहेत. अशातच रितेश देशमुखने होस्टिंगची सूत्र हाती घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. शोचा ऐतिहासिक टीआरपी पाहून रितेशची बायको जिनिलीया देशमुखचा ( Genelia Deshmukh ) आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 record break trp genelia compliments husband riteish deshmukh sva 00