बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया सिद्दिकी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ते दोघेही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतर नवाजकडून आलियाने पोटगी म्हणून लाखो रुपये घेतले, असे म्हटलं जात होतं. मात्र नुकतंच त्याबद्दल तिने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया सिद्दिकी ही ‘बिग बॉस ओटीटी सीजन २’ मध्ये सहभागी झाली होती. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. यानंतर तिने बॉलिवूड बबल या चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत आलियाने नवाजुद्दीन सिद्दिकीकडून घेतलेली रक्कम, मुलीचा बॉयफ्रेंड आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर भाष्य केले.
आणखी वाचा : “आपल्याला बायकांच्या…” ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर आदेश बांदेकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मी नवाजुद्दीनकडून आतापर्यंत एकही रुपया घेतलेला नाही. त्याउलट मला तुमच्याकडून काहीही नको, असे मी त्यांना लेखी दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, तो मला दर महिन्याला खर्चासाठी पैसे देतो. पण मी त्याला हे घर माझ्याकडून घेऊ नका, असे सांगितले आहे. कारण माझा त्या घरात जीव अडकला आहे. माझ्या वाटणीचा हिस्सा विकून मला कर्ज फेडायचं आहे. जेणेकरुन मी आयुष्यात स्थिर होऊ शकेन” असे आलिया म्हणाली.

आणखी वाचा : “माझ्यासाठी उभे न राहणारे लोक…” उर्मिला मातोंडकरचे मोठे वक्तव्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

तसेच आलियाला तिच्या आयुष्यात आलेल्या नवीन व्यक्तीबद्दल विचारले असता ती म्हणाली, “इटलीमध्ये राहणाऱ्या माझ्या बॉयफ्रेंडचे डोळे मला फार आवडतात. जेव्हा मी फार त्रासात होती, तेव्हा त्यानेच मला आधार दिला होता.” त्याबरोबरच मुलगी शोराच्या आयुष्यात कोणीही नाही. तिने तिच्या एका मित्राची गाठभेट घालून दिली होती. “जर तिच्या आयुष्यात असं काही असेल तर ती नक्कीच मला सांगेल”, असेही आलियाने यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott fame aaliya siddiqui talk about her boyfriend nawazuddin siddiqui alimony interview nrp