बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी अभिनेते अनिल कपूर बिग बॉस ओटीटीवरील तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ओटीटीच्या या तिसऱ्या पर्वाला मोठ्या धमाक्यात सुरुवात झाली असून आता सहभागी झालेल्या स्पर्धकांविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत. अरमान मलिक आणि दोन पत्नींवरून सोशल मीडियावर गोंधळ सुरू असतानाच रॅपरच्या दुनियेत ओळखला जाणारा नावेद शेख अर्थात नॅझीनेदेखील आपल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाचा वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला, याबद्दल खुलासा केला आहे.

घरातील इतर सदस्यांबरोबर बोलत असताना नॅझीने ‘गली बॉय’ या चित्रपटाबाबत वक्तव्य केले आहे. तो म्हणतो, माझे ‘आफत’ हे गाणे त्यावेळी प्रदर्शित झाले होते आणि त्याला यश मिळत होते. ते गाणे ऐकल्यानंतर जोया अख्तर यांनी मला शोधून काढले. त्यांना हे गाणे आणि त्याचा जॉनर खूप आवडला. मात्र, ‘गली बॉय’ चित्रपटाची कथा काल्पनिक असून ती संपूर्ण हिप-हॉप समुदायाची गोष्ट आहे. या चित्रपटाचा माझ्या आयुष्यावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूंनी परिणाम झाला. कारण माझे पहिले गाणे जरी प्रदर्शित झाले असले तरी मला प्रसिद्धीझोतात या चित्रपटाने आणले. बॉलीवूडमध्ये माझी जागा निर्माण झाली. माझा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. मात्र, जसा मला याचा फायदा झाला तसा तोटाही झाला.

Shocking video of a young man died due to making a video while jumping into a river
आयुष्य इतकं स्वस्त असतं का? व्हिडीओ बनवण्याच्या नादात होत्याचं नव्हतं झालं, तरुणाच्या मृत्यूचा VIDEO पाहून थरकाप उडेल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Anup Soni Congress Advertisement
Anup Soni : क्राईम पेट्रोल फेम अभिनेता काँग्रेसच्या जाहिरातीत? व्हिडिओ शेअर करत म्हणाले…
फसक्लास मनोरंजन
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”
50 Years of Deewaar Movie in Marathi
50 Years of Deewaar : दीवारची पन्नाशी! अमिताभ नव्हे ‘हा’ सुपरस्टार साकारणार होता ‘विजय’
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar make cold coffee for spardha thigle
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरने नव्या मुक्तासाठी केली ‘ही’ खास गोष्ट, स्वरदा ठिगळे फोटो शेअर करत म्हणाली…
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!

कारण रणवीरने जी भूमिका केली आहे, ती माझ्या आयुष्यावर प्रेरित असली तरी त्यामध्ये काही काल्पनिक गोष्टींचादेखील समावेश केला गेला आहे. ज्याप्रमाणे रणवीरने चित्रपटात मुराद अहमदची भूमिका केली आहे, तो संपूर्ण मीच आहे असे प्रेक्षकांना वाटत होते. त्यामुळे लोकांनी माझ्याकडे नकारात्मक दृष्टीने बघायला सुरुवात केली. या सगळ्याचा माझ्या मानसिक आरोग्यावर आणि खाजगी आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला. कारण चित्रपटात माझ्या दोन गर्लफ्रेंड दाखवल्या आहेत आणि परिस्थितीदेखील फार गरीब दाखवली आहे, खऱ्या आयुष्यात मात्र मी चित्रपटात दाखवला तितका गरीब नाही. चित्रपटात मी ड्रायव्हर असल्याचे दाखवले आहे, मात्र प्रत्यक्षात तसे नाही.”

दरम्यान, बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आले आहे. यामध्ये १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील एक स्पर्धक घराबाहेर पडला असून आता १५ स्पर्धक घरात आहेत. अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक, चंद्रिका दीक्षित, बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरी, शिवानी कुमारी, टीव्ही अभिनेत्री सना सुलतान यांचा समावेश आहे. याबरोबरच विशाल पांडे, लव कटारिया, पत्रकार दीपक चौरसिया, अभिनेता साई केतन राव, टॅरो कार्ड रीडर मुनीषा खटवानी, सना सुलतान, रॅपर नॅझी आणि अभिनेत्री पौलामी दास यांचा समावेश आहे

Story img Loader