देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज (२८ मे) दिल्लीत पार पडलं. देशाच्या नव्या संसद भवनाचा लोकार्पण सोहळा सुरु असताना चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी यावार प्रतिक्रिया दिल्या. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही नव्या संसद भवनाचा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले.

आता शाहरुख खानच्या या ट्वीटची चर्चा एका वेगळ्याच अर्थाने होताना दिसत आहे. तब्बल २० विरोधी पक्षांनी नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला बॉयकॉट करायचं ठरवलं, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शाहरुख खानचे केलेल्या या ट्वीटचा उल्लेख करत भाजपाला टोला लगावला आहे.

आणखी वाचा : “तो एक प्रोपगंडा चित्रपट…” कमल हासन यांच्यापाठोपाठ अनुराग कश्यपचं ‘द केरला स्टोरी’बद्दल मोठं विधान

याविषयी ट्वीट करताना क्लाईड क्रास्टो लिहितात, “शाहरुख खाननेही नव्या संसदभवनाच्या उद्घाटन सोहळ्याचं ट्वीट करत कौतुक केलं आहे आणि समर्थन केलं आहे, महाराष्ट्रातील भाजपा नेते मंडळी आता शाहरुखच्या चित्रपटांवर बंदी आणायची मागणी करणार नाहीत.” या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

शाहरुख खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाला देशभरातून चांगलाच विरोध झाला. बऱ्याच ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालायची मागणीदेखील करण्यात आली होती. त्याबद्दल बोलताना क्लाईड क्रास्टो यांनी या ट्वीटमधून अप्रत्यक्षरिती टोला लगावला आहे. आता शाहरुख ‘जवान’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader