दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या बॉलीवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत त्यांचं निधन झालं. त्याचं सौंदर्य, दमदार अभिनय याचे लाखो चाहते होते. ९० चं दशक त्यांनी खऱ्या अर्थाने गाजवलं. ‘लाडला’, ‘लम्हे’, ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. श्रीदेवी यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही मुली आता बॉलीवूडमध्ये सक्रिय झाल्या आहेत.

लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळच्या जंक्शनला नाव देणार

trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी

श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या एका विशिष्ट जंक्शनला श्रीदेवी यांचं नाव दिलं जाणार आहे. दिवंगत अभिनेत्रीला श्रद्धांजली म्हणून महापालिकेने लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळच्या एका जंक्शनला ‘श्रीदेवी कपूर चौक’ असं नाव देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : ‘भैय्याजी’ आहे तरी कोण? मनोज बाजपेयींच्या १०० व्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! बिहारमध्ये होणार जबरदस्त अ‍ॅक्शन

लोखंडवाला परिसरातील ग्रीन एकर्स टॉवर येथे त्यांचं वास्तव्य होतं. तसेच त्यांची अंत्ययात्रा याच पुरुषोतम टंडन रोड परिसरातून निघाली होती. त्यामुळे या जंक्शनला ‘श्रीदेवी कपूर चौक’ असं नाव देण्याची मागणी रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती.

हेही वाचा : Video : गुलाबी रंगाचा ड्रेस, टिकली, मोत्याची माळ अन्…; प्रसाद ओकच्या लाडक्या श्वानाचा वाढदिवसानिमित्त खास लूक

श्रीदेवी यांच्या जीवनावर बायोपिक

डीएनएला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांना श्रीदेवीच्या जीवनावर आधारित बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी, “ती एक अतिशय खाजगी व्यक्ती होती आणि तिचे आयुष्य देखील खाजगी राहिले पाहिजे. त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत हे होऊ देणार नाही.” असं सांगितलं होतं.

हेही वाचा : Video : अखेर भारतात परतली मुक्ता बर्वे! विमानतळावर ‘नाच गं घुमा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, मैत्रिणींना भेटून झाली भावुक

दरम्यान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणून संबोधलं जातं. ८०-९० च्या दशकात या ‘हवाहवाई’ने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून प्रत्येकाच्या मनावर आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली होती. श्रीदेवी तामिळ सिनेमांमध्ये काम करत होत्या तेव्हाच बोनी कपूर त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या मृत्यूने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला होता.

Story img Loader