बॉलीवूड सुपरस्टार बॉबी देओलने ९० च्या दशकापासून ते आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘सोल्जर’, ‘गुप्त’, ‘बरसात’ असे हिट चित्रपट बॉबी देओलच्या नावावर आहेत. आजही तो चित्रपटसृष्टीत तितकाच सक्रिय आहे. ‘अ‍ॅनिमल’मधून दमदार कमबॅक करणाऱ्या बॉबी देओलचं एक वेगळंच रूप प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं. यात त्याने खलनायकाची भूमिका इतकी अप्रतिम साकारली की त्याच्या छोट्याशा भूमिकेचं किंबहुना रणबीरपेक्षाही जास्त कौतुक झालं. या चित्रपटातील ‘जमाल कुडू’ या गाण्यावर बॉबी देओल डोक्यावर दारूचा ग्लास घेत थिरकताना दिसला होता, हे गाणंही खूप व्हायरल झालं.

आज २७ जानेवारी रोजी बॉबी देओलचा ५५ वा वाढदिवस आहे. कलाकार त्यांचे वाढदिवस नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करताना दिसतात. बॉबी देओलने आज मीडिया, सहकलाकार तसेच त्याच्या चाहत्यांसह वाढदिवस साजरा केला. त्याच्या आजच्या वाढदिवसाचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

हेही वाचा… मृणाल कुलकर्णींनी दिल्या खास ब्यूटी टीप्स; त्यांच्या आवडत्या मेकअपच्या तीन वस्तूंचं नाव घेत म्हणाल्या…

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. यात बॉबीची एक चाहती सेल्फीसाठी त्याला विनंती करताना दिसत आहे. बॉबीने फोटो काढण्यासाठी चाहतीचा फोन घेतला आणि सेल्फी काढला. त्यानंतर अचानक त्या चाहतीने चक्क बॉबीच्या गालावर किस केलं. यानंतर क्षणभर बॉबी गोंधळला आणि नंतर तो हसला.

व्हिडीओमध्ये निळ्या रंगाच्या ट्रॅकसूट आणि काळ्या हॅटमध्ये बॉबी देओल अतिशय देखणा दिसत आहे. बॉबी देओलसाठी त्याच्या चाहत्यांनी केक आणून त्याचा वाढदिवस साजरा केला. अनेकजण त्याच्यासह फोटो काढत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील अबरारची पोज देतानाही दिसले.

हेही वाचा… “मी स्वतःला सिद्ध करून थकलेय,” असे का म्हणाली मराठमोळी मृणाल ठाकूर? जाणून घ्या…

दरम्यान, बॉबी देओलच्या कामाबाबत बोलायचं झाल तर त्याचा आगामी चित्रपट कंगुवा आहे. हा तामिळ चित्रपट असून यावर्षीच प्रदर्शित होणार आहे. तसेच हरी हरा वीरा मल्लू या तेलुगू सिनेमामध्येही बॉबी देओल काम करणार आहे.

Story img Loader