बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अनेक स्तरातून बॉबीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनीही आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणासाठी त्याच्या घराबाहेर पोहचले होते. दरम्यान बॉबीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो चाहत्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉबीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याासाठी चाहत्यांनी त्याच्या बंगल्याबाहेर एकच गर्दी केली होती. एवढचं नाहीतर अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त खास आयोजनही करण्यात आले होते. बॉबीही चाहत्यांच्या आग्रहाचा मान ठेवत बंगल्याबाहेर आला आणि आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी चाहत्यांनी बॉबीसाठी पाच थरांचा केक आणला होता. तसेच बॉबीच्या गळ्यात भव्य हार घालत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. सोशल मीडियावर बॉबीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉबीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ चित्रपटामधून बॉबी देओलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘अ‍ॅनिमल’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटानंतर बॉबी देओलच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आता लवकरच त्याचा ‘कांगुवा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील बॉबीचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bobby deol celebrates 55th birthday with fans cuts 5 tier cake video viral dpj