रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. मीडिया रीपोर्टनुसार ११ व्या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ने ७०० कोटींचाही टप्पा पार केला आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटात रणबीरबरोबरच बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी या दोघांच्या कामाची प्रचंड चर्चा होत आहे. बॉबी देओलला तर या चित्रपटामुळे एक वेगळी ओळखच मिळाली आहे. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान बॉबीने या चित्रपटातील एका वादग्रस्त सीनबद्दल भाष्य केलं आहे. चित्रपटात बॉबी देओलची एंट्री होते तेव्हा त्याचं पात्र स्वतःच्याच लग्नात एका व्यक्तीचा खून करतं अन् लगेच तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांसमोर आपल्या पत्नीवर शारीरिक बळजबरी करताना दाखवलं आहे. यानंतर बॉबी देओलचं पात्र आपल्या तीनही बायकांसह शारीरिक संबंध ठेवताना आपल्याला पाहायला मिळतं.

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
Manoj Bajpayee on being stereotyped as middle class No director could think of me as a rich guy experts share ways to deal with rejection
“कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि

आणखी वाचा : ‘डिस्को डान्सर’ने १०० कोटी कमावल्याचं समजताच अशी होती मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढे पैसे…”

वैवाहिक बलात्काराच्या या सीनवरुन प्रचंड टीका झाली असून यामध्ये बॉबीसह काम करणाऱ्या अभिनेत्रीनेही यावर भाष्य केलं होतं. आता या सीनबद्दल आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादंगाबद्दल खुद्द बॉबी देओलने नुकतंच भाष्य केलं आहे. क्विंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉबीने या सीनचं स्पष्टीकरण देत त्याची बाजू घेतली आहे.

बॉबी म्हणाला, “मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाहीये, मुळात एवढ्या कमी वेळात एखादं पात्र नेमकं कसं आहे याबद्दल तुमही कसा कयास लावू शकता? यासाठी चित्रपटातील त्या सगळ्या सीन्सची नितांत गरज होती. आपल्या आसपास ज्या गोष्टी घडतात त्याच चित्रपटात, कथेत उतरतात. या सगळ्या गोष्टी आपल्या समाजात घडतात. आम्ही त्यांचं समर्थन अजिबात करत नाही. आम्ही नट आहोत, आम्ही फक्त ते पात्र साकारत लोकांचं मनोरंजन करत आहोत. जर आमचा असा हेतू योग्य नसता तर चित्रपट इतका यशस्वी ठरला नसता.”

पुढे बॉबी म्हणाला, “या सगळ्या गोष्टी आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला घडतात. आपण या क्रूर दुनियेत राहतोय अन् ‘अ‍ॅनिमल’ एकप्रकारे लोकांना जागरूक करायचंच काम करतोय. मी स्वतः या गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडताना पाहिल्या आहेत.” बॉबीच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ‘अ‍ॅनिमल’मधील बऱ्याच सीन्समुळे वादंग निर्माण झालं, वेगवेगळ्या स्तरातून चित्रपटावर टीकाही झाली. तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.