बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरची जबरदस्त चर्चा आहे. रणबीरचा आत्तापर्यंतचा सर्वात जबरदस्त आणि हिंस्र अवतार लोकांना प्रचंड आवडला आहे. रणबीरबरोबरच सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे बॉबी देओलची. टीझरप्रमाणेच ट्रेलरमध्येही काही सेकंदच आपल्याला बॉबीचं पात्र पाहायला मिळतं, पण तेवढ्याच वेळात बॉबीने प्रेक्षकांवर प्रभाव पाडला आहे.

A sailor on a fishing boat in Ratnagiri cut off Tandela head and set the boat on fire
रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून; देवगड समुद्रात घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Vishnu Manohar, Vishnu Manohar Dosa,
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डोसा आणि विक्रम, काय आहे वाचा
Zeenat Aman Raj Kapoor krishna kapoor
“मला त्या अवतारात बघून…”, झीनत अमान यांनी सांगितली राज कपूर यांच्याविषयी आठवण; म्हणाल्या, “मूठभर सोन्याच्या…”
Bollywood actor salman khan Dance On Kombadi Palali Song sung by Vaishali made old video viral softnews
Video: ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर सलमान खानचा जबरदस्त डान्स पाहिलात का? वैशाली माडेला लावलं होतं गायला, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
Akshay Kumar First Flop Film Saugandh
खिलाडी कुमारचा पहिला फ्लॉप चित्रपट तुम्हाला माहितीये का?, ९० मध्ये आपटलेला चित्रपट आता OTT वर सुपरहिट!
akshay kumar
फक्त एक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अक्षय कुमारचा केलेला अपमान? अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Sohail Khan ex wife Seema Sajdeh is dating Vikram Ahuja
एकेकाळी ज्याच्याशी मोडला साखरपुडा, आता त्यालाच डेट करतेय सोहेल खानची एक्स बायको, कोण आहे सीमा सजदेहचा बॉयफ्रेंड?

आणखी वाचा : ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये आमिर खानची एन्ट्री? खुद्द सलमान खानने केला खुलासा

या ट्रेलरमध्ये बॉबीचा एक जबरदस्त रावडी लुक आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉबी यात नकारात्मक भूमिकेत दिसणार हे तर स्पष्ट झालंच आहे, परंतु याबरोबरच बॉबीचा रणबीरबरोबरचा एक शर्टलेस अॅक्शन सीन जास्त चर्चेत आहे. या सीनमधील बॉबीच्या पिळदार शरीरयष्टीची जबरदस्त चर्चा आहे. या बॉडीसाठी बॉबीने प्रचंड मेहनत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तब्बल ४ महीने हे शरीर कमावण्यासाठी बॉबीने जिवापाड मेहनत घेतली आहे.

बॉबीचा फिटनेस ट्रेनर प्रज्वल शेट्टीने ‘आज तक’शी संवाद साधताना या गोष्टीवर प्रकाश टाकला. प्रज्वल म्हणाला, “बॉबी यांचा बॉडीची ज्या पद्धतीने सोशल मीडियावर लोक प्रशंसा करत आहे ते पाहून फार आनंद होतो. मी त्यांना ‘रेस ३’पासून ट्रेन करतो आहे. ‘अ‍ॅनिमल’साठी त्यांनी ४ महीने मेहनत घेतली आहे. आम्ही दोघांनी ते ४ महीने झोकून देऊन बॉबी यांच्या या लुकसाठी मेहनत घेतली.”

संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणे बॉबी हा रणबीरपेक्षा वरचढ दिसणं गरजेचं असल्याने प्रज्वल यांनी बॉबीच्या बॉडीसाठी तशी मेहनत घेतली. बॉबीच्या डायट आणि ट्रेनिंगबद्दल प्रज्वल म्हणाला, “खरंतर त्यांचं वजन तेव्हा फार कमी होतं, त्यामुळे त्यांच्या बॉडीवर काम करण्यासाठी मी त्यांचं पूर्ण डायट आणि वर्कआऊट प्लॅन केला होता. रोज जवळपास आणि एक तास वेट ट्रेनिंग करायचो, याबरोबरच सकाळी आणि संध्याकाळी बॉबी हाय इंटेंसिटी कार्डियोदेखील करत.”

बॉबीच्या डायटबद्दल सांगताना प्रज्वल म्हणाला, “बॉबी सकाळी अंडी, ओटमिल खायचे, दुपारच्या जेवणात चिकन आणि थोडासा भात हा त्यांचा आहार होता. संध्याकाळी ते सलाड घ्यायचे आणि रात्री ते चिकन किंवा मासे यांचा समावेश आहारात करायचे. बॉबी पंजाबी असून ते फार खाण्याचे शौकीन नाहीत ही फार आश्चर्यकारक बाब आहे. त्यामुळे अगदी कडक पथ्य पाळण्यात त्यानं काहीच अडचण येत नसे. त्यांना गोड पदार्थ फार आवडतात परंतु हे चार महीने त्यांनी गोड पदार्थांचेही सेवन पूर्णपणे बंद केले होते.”