बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरची जबरदस्त चर्चा आहे. रणबीरचा आत्तापर्यंतचा सर्वात जबरदस्त आणि हिंस्र अवतार लोकांना प्रचंड आवडला आहे. रणबीरबरोबरच सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे बॉबी देओलची. टीझरप्रमाणेच ट्रेलरमध्येही काही सेकंदच आपल्याला बॉबीचं पात्र पाहायला मिळतं, पण तेवढ्याच वेळात बॉबीने प्रेक्षकांवर प्रभाव पाडला आहे.

आणखी वाचा : ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये आमिर खानची एन्ट्री? खुद्द सलमान खानने केला खुलासा

या ट्रेलरमध्ये बॉबीचा एक जबरदस्त रावडी लुक आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉबी यात नकारात्मक भूमिकेत दिसणार हे तर स्पष्ट झालंच आहे, परंतु याबरोबरच बॉबीचा रणबीरबरोबरचा एक शर्टलेस अॅक्शन सीन जास्त चर्चेत आहे. या सीनमधील बॉबीच्या पिळदार शरीरयष्टीची जबरदस्त चर्चा आहे. या बॉडीसाठी बॉबीने प्रचंड मेहनत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तब्बल ४ महीने हे शरीर कमावण्यासाठी बॉबीने जिवापाड मेहनत घेतली आहे.

बॉबीचा फिटनेस ट्रेनर प्रज्वल शेट्टीने ‘आज तक’शी संवाद साधताना या गोष्टीवर प्रकाश टाकला. प्रज्वल म्हणाला, “बॉबी यांचा बॉडीची ज्या पद्धतीने सोशल मीडियावर लोक प्रशंसा करत आहे ते पाहून फार आनंद होतो. मी त्यांना ‘रेस ३’पासून ट्रेन करतो आहे. ‘अ‍ॅनिमल’साठी त्यांनी ४ महीने मेहनत घेतली आहे. आम्ही दोघांनी ते ४ महीने झोकून देऊन बॉबी यांच्या या लुकसाठी मेहनत घेतली.”

संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणे बॉबी हा रणबीरपेक्षा वरचढ दिसणं गरजेचं असल्याने प्रज्वल यांनी बॉबीच्या बॉडीसाठी तशी मेहनत घेतली. बॉबीच्या डायट आणि ट्रेनिंगबद्दल प्रज्वल म्हणाला, “खरंतर त्यांचं वजन तेव्हा फार कमी होतं, त्यामुळे त्यांच्या बॉडीवर काम करण्यासाठी मी त्यांचं पूर्ण डायट आणि वर्कआऊट प्लॅन केला होता. रोज जवळपास आणि एक तास वेट ट्रेनिंग करायचो, याबरोबरच सकाळी आणि संध्याकाळी बॉबी हाय इंटेंसिटी कार्डियोदेखील करत.”

बॉबीच्या डायटबद्दल सांगताना प्रज्वल म्हणाला, “बॉबी सकाळी अंडी, ओटमिल खायचे, दुपारच्या जेवणात चिकन आणि थोडासा भात हा त्यांचा आहार होता. संध्याकाळी ते सलाड घ्यायचे आणि रात्री ते चिकन किंवा मासे यांचा समावेश आहारात करायचे. बॉबी पंजाबी असून ते फार खाण्याचे शौकीन नाहीत ही फार आश्चर्यकारक बाब आहे. त्यामुळे अगदी कडक पथ्य पाळण्यात त्यानं काहीच अडचण येत नसे. त्यांना गोड पदार्थ फार आवडतात परंतु हे चार महीने त्यांनी गोड पदार्थांचेही सेवन पूर्णपणे बंद केले होते.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bobby deol fitness trainer talks about actors workout and diet plans for animal movie avn