बॉलीवूड सुपरस्टार बॉबी देओलने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली. या चित्रपटातील ‘जमाल कुडू’ या गाण्यावर बॉबी देओल डोक्यावर दारूचा ग्लास घेत थिरकताना दिसला तेव्हा हे गाणं खूप व्हायरल झालं होतं. अशातचं बॉबी देओलची एक्सवरील पोस्ट आता व्हायरल होतेय. यात बॉबी देओलने क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यात एम एस धोनी बॉबी देओलला एका गोष्टीची विनंती करताना दिसतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनी काय म्हणाला?

एम.एस. धोनीचा उल्लेख करत बॉबी देओलने त्याच्या एक्स अकाउंटवरून एक ट्वीट शेअर केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केलेला दिसत आहे. व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन असलेल्या या फोटोत धोनी भाई अशा नावाने एक मेसेज आल्याचे दिसत आहे. “बॉबी, तो माझा व्हिडीओ कृपया करून डिलीट कर ना… खूपच लाजिरवाणा आहे”, असे त्यात म्हटल्याचं दिसत आहे. यावर बॉबी देओलने देखील उत्तर दिले आहे.

बॉबी देओलचे हटके उत्तर

बॉबीने या पोस्टबरोबर हटके कॅप्शनही दिलं आहे. “माही भावा, ठीक आहे मी डिलीट करतो”, असे बॉबी देओलने म्हटले आहे. त्यासोबतच “लीक कर दू क्या” असे हॅशटॅग्स बॉबीने वापरले आहेत.

बॉबीच्या या व्हायरल एक्स पोस्टवरून नेटकरी विचारत पडले आहेत. नक्की कोणत्या व्हिडीओबद्दल बॉबी आणि धोनी चर्चा करत आहेत? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स करत या व्हिडीओबाबत विचारणा केली आहे. एकाने कमेंट करत लिहिले, “बॉबी भाऊ तुम्ही तर हॅकर निघालात. यावेळेस तुम्ही थालाला हॅक केलतं.” तर दुसऱ्याने लिहिलं, “बॉबी सर कृपया करून तो व्हिडीओ लीक करा.” काही नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… VIDEO: होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले, “वयाचा विसर पडेल…”

दरम्यान, बॉबी देओलच्या कामाबाबत बोलायचं झाल तर, त्याचा आगामी चित्रपट कंगुवा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा तामिळ चित्रपट असून यावर्षीच प्रदर्शित होणार आहे. तसेच हरी हरा वीरा मल्लू या तेलुगू सिनेमामध्येही बॉबी देओल झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bobby deol has ms dhoni video dhoni requested bobby to delete screenshot posted on x dvr