रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची आजही वेगवेगळ्या कारणांमुळे मोठी चर्चा होताना दिसते. रणबीर कपूर, रश्मिका यांच्याबरोबरच बॉबी देओलच्या भूमिकेची मोठी चर्चा झाली. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याने या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय म्हणाला बॉबी देओल?
अभिनेता बॉबी देओलने नुकतीच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘अॅनिमल’ चित्रपटातील भूमिका कशी मिळाली याबद्दल बोलताना म्हटले की, “संदीप रेड्डी वांगा यांचा मला मेसेज आला होता. त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली आणि सांगितले, एका चित्रपटासंबंधित बोलण्यासाठी भेटायचे आहे. मी विचार केला, खरंच तो आहे का? जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याने मला सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये ज्यावेळी मी सहभागी झालो होतो, तेव्हाचा फोटो दाखवला आणि म्हटले, “मला तुला कास्ट करायचे आहे, कारण तुझे हे हावभाव मला आवडले आहेत.”
त्याच्या भूमिकेविषयी बोलताना त्याने म्हटले, “मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काहीतरी पाहिजे होतं, त्यामुळे संदीपने मला सांगितले की तुझी भूमिका मुकी असणार आहे, तेव्हा वाटले की माझा आवाज माझी शक्ती आहे, तरीही ती भूमिका मी करायची ठरवली.”
पुढे बोलताना बॉबी देओलने सांगितले, “या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी दीड वर्ष वाट पाहिली आहे. चित्रपट साडेतीन तासांचा असल्याने ते रणबीर कपूरबरोबर जास्त काळ शूट करत होते आणि त्या काळात मी हा विचार करत असे की, ते त्यांचा विचार बदलतील का? ते अचानक म्हणतील का, मला तुझी गरज नाही. त्या भूमिकेसाठी मी साइन लॅग्वेंज शिकून घेतली. त्याला खूप यश मिळाले. मी याची कल्पना केली नव्हती की त्या पात्राचा एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण होईल.”
रणबीरबरोबर काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना त्याने म्हटले, “तो मोठा स्टार आहे, तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. मी त्याच्याबरोबर १२ दिवस शूटिंग केले. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. आमच्यातील नाते सुंदर आहे. तो खूप मोठा कलाकार आहे, मात्र मी रणबीर आणि आलियाचा चाहता आहे.”
‘अॅनिमल’ चित्रपटाचे यश कसे साजरे केले? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले, “माझा भाऊ सनी मला हे यश साजरे करूयात असा आग्रह करत होता. मात्र, हा चित्रपट येण्याआधी तीन महिन्यांपूर्वी माझ्या सासूचे निधन झाले होते. त्या माझ्या खूप जवळच्या होत्या. माझा विश्वास आहे त्यांच्या आशीर्वादामुळे मला इतके प्रेम मिळाले. त्यांच्या निधनामुळे मी यश साजरे करण्याचे टाळले.”
‘अॅनिमल’ चित्रपटानंतर बॉबी देओल आता ‘कंगुआ’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.