रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. मीडिया रीपोर्टनुसार ११ व्या दिवशी ‘अॅनिमल’ने ७०० कोटींचाही टप्पा पार केला आहे. ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटात रणबीरबरोबरच बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी या दोघांच्या कामाची प्रचंड चर्चा होत आहे. बॉबी देओलला तर या चित्रपटामुळे एक वेगळी ओळखच मिळाली आहे. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान बॉबीने या चित्रपटातील वगळलेल्या सीनबद्दल खुलासा केला आहे. चित्रपटातील बऱ्याच सीन्सवरुन वादंग निर्माण झाले आहे अन् जर बॉबीचा हा सीन चित्रपटात घेतला असता तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणखी तीव्र असत्या असा अंदाज बॉबीच्या वक्तव्यावरुन आपण लावू शकतो.
आणखी वाचा : ‘अॅनिमल’च्या वादळात ‘सॅम बहादुर’चीही बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी; १२ व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये विमानाच्या धावपट्टीवर रणबीर आणि बॉबी देओलमधल्या फाईट सिक्वेन्सची जबरदस्त चर्चा आहे. या सीनमध्ये रणबीर बॉबी देओलला ठार मारतो, पण तरी ते दोघे एकमेकांचे भाऊ असल्याने त्यांच्या नात्यात एक ट्विस्ट आणण्यासाठी अन् त्या दोन भावांमधील प्रेम दाखवण्यासाठी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा या सीनमध्ये बॉबी रणबीरला किस करताना दाखवणार होते. याचा खुलासा नुकताच बॉबीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
‘क्विंट’शी संवाद साधताना बॉबी म्हणाला, “या फायटिंग सीनदरम्यान आमच्यात एक कीसिंगदेखील दाखवला जाणार होता. एकमेकांशी लढताना मध्येच मी रणबीरला किस करताना संदीप दाखवणार होता. त्यानंतर रणबीर मला मारणार होता. पण संदीप यांनी हा कीसिंग सीन आयत्या वेळी चित्रपटातून काढून टाकला. बहुतेक नेटफ्लिक्सच्या अनकट व्हर्जनमध्ये तुम्हाला हा भाग पाहायला मिळू शकतो.”
‘अॅनिमल’मधील बऱ्याच सीन्समुळे वादंग निर्माण झालं, वेगवेगळ्या स्तरातून चित्रपटावर टीकाही झाली. तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉबी देओल व रणबीरमधला कीसिंग सीनसुद्धा यात घेण्यात आला असता तर चित्रपटावर होणारी टीका आणखी वाढली असती असं यावरुन स्पष्ट झालं आहे.