रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटावर प्रचंड टीका झाली, तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. या चित्रपटात रणबीर कपूरच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली आहे. या चित्रपटात बॉबी देओलच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारणारी शफीना शाह ही अभिनेत्री चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शफीना शाह ही एक लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने २०२३ मध्ये मिस पाकिस्तान वर्ल्डचा किताबही जिंकला होता. शफीना ही पाकिस्तानची सर्वात सुंदर महिला मानली जाते. शफीना जागतिक स्तरावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती सौंदर्य स्पर्धेबरोबरच अभिनय क्षेत्रातील करिअरवही लक्ष केंद्रित करणार आहे.

वर्ष होण्याआधीच मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न? पतीचं विदेशातील घर सोडून भारतात परतली, तिची टीम म्हणाली…

शफीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिला यूकेच्या एका एजन्सीच्या माध्यमातून ‘ॲनिमल’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या एजन्सीद्वारे शफीनाला चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी बोलावण्यात आलं आणि ऑडिशन पास केल्यावर तिला ही भूमिका मिळाली. या चित्रपटात शफीनाने बॉबी देओलच्या तीन पत्नींपैकी दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. तिची भूमिका फार मोठी नसली तरी महत्त्वाची होती.

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुजराती बिझनेसमनशी गोव्यात बांधली लग्नगाठ, भर मंडपात केलं लिपलॉक, Photos चर्चेत

याआधी तिला या चित्रपटात बॉबीच्या तिसऱ्या पत्नीच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु ती इंटिमेट सीन करण्यात कम्फर्टेबल नव्हती, त्यामुळे तिने नकार दिला, त्यानंतर तिला दुसऱ्या पत्नीची भूमिका मिळाली, असं शफीनाने सांगितलं होतं. शफीनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, त्यासाठी आनंद व्यक्त केला होता. चित्रपटात बॉबी देओल, रणबीर कपूर व संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबर काम करायला मिळालं, हा मोठा सन्मान असल्याचं तिने म्हटलं होतं.