अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला आहे. श्रेयस सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बॉबी देओलने श्रेयसच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. बॉबी व श्रेयस जवळचे मित्र आहेत. श्रेयसच्या हृदयाने १० मिनिटं काम करणं थांबवलं होतं, अशी माहिती बॉबीने दिली आहे.

‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना बॉबी म्हणाला, “मी श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेशी बोललो. ती खूप अस्वस्थ झाली होती. श्रेयसचं हृदय सुमारे १० मिनिटं बंद पडलं होतं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे तो लवकर बरा होवो हीच सर्वांनी प्रार्थना करा.”

actor Sudip Pandey died of heart attack
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kartik Aaryan Recalls His Struggle
वारंवार नकार तरी मानली नाही हार; कार्तिक आर्यनने शेअर केल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाला, “मला लाज…”
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात करण्यात आलं दाखल

गुरुवारी रात्री श्रेयसने बरं वाटत नसल्याचं दीप्तीला सांगितलं. नंतर दीप्ती त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याला चक्कर आली. त्याने दिवसभर ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग केलं होतं आणि तो ठणठणीत होता. तो सेटवर सर्वांशी गप्पा मारत होता, त्याने काही अ‍ॅक्शन असलेले सीक्वेन्सही शूट केले होते. शूट संपल्यानंतर तो घरी परत गेला आणि त्याची प्रकृती खालावली, अशी माहिती समोर आली आहे.

सोनू निगमने मागितली पाकिस्तानी गायकाची माफी; सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल, म्हणाला, “दुबईतील माझे…”

श्रेयसच्या प्रकृतीबाबत गुरुवारी रात्रीच रुग्णालयाकडूनही माहिती देण्यात आली होती. ‘आज रात्री १० वाजता श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा आहे. तो दिवसभर शूटिंग करत होता, त्यावेळी त्याला काही झालं नाही पण घरी आल्यावर त्याला अस्वस्थता जाणवू लागली. नंतर त्याची पत्नी दीप्ती त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन आली होती,’ असं त्यांनी सांगितलं होतं.

Story img Loader