अभिनेता बॉबी देओल काही काळ सिनेमांपासून दूर होता. त्याच्या करिअरमध्ये आलेल्या कठीण काळाबद्दल त्याने अनेक मुलाखतींमध्ये भाष्य केले आहे. त्याने ‘रेस ३’ या सिनेमातून पुनरागमन केले, त्यानंतर ‘हाऊसफुल ४’ आणि ‘आश्रम’सारख्या वेब सीरिजमध्ये तो झळकला. बॉबी पडद्यावर दिसत होता, पण त्याला खरी लोकप्रियता ‘अॅनिमल’ या सिनेमाने मिळवून दिली. गेल्या वर्षी आलेल्या या सिनेमात त्याने एक शब्दही न बोलता आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि त्याच भूमिकेसाठी त्याला ‘आयफा’मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. बॉबीने बक्षीस स्वीकारण्याआधी पत्नीबरोबर केलेल्या एका कृतीमुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यंदाचा आयफा अवॉर्ड (आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार) अबुधाबीत संपन्न झाला. ॲनिमल सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला आयफा अवॉर्ड मिळाला हा अवॉर्ड घेण्याआधी तो भावूक झाल्याचं दिसलं.
पुरस्कार जाहीर झाला अन्…
बॉबीला आयफा सोहळ्यात सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याने भावूक होत आपल्या पत्नीचा किस घेतला. या क्षणाने प्रेक्षकांनाही भावूक केले.
Guys you need to watch this?❤️
— NJ (@Nilzrav) September 28, 2024
BEST ACTOR IN A NEGATIVE ROLE#BOBBYDEOL?? He had tears in his eyes, and then fans went crazy on something??? #IIFA2024 #ANIMAL pic.twitter.com/6wK6KaWRnC
‘बॉबी बॉबी’ नावाचा जल्लोष
बॉबी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जाताच प्रेक्षकांनी मोठ्या आवाजात ‘बॉबी बॉबी’ असा जल्लोष सुरू केला. उपस्थितांचा उत्साह एवढा होता की बॉबीला सुरुवातीला बोलण्याची संधीच मिळाली नाही. तेव्हा बॉबी म्हणाला, “तुमच्या जल्लोषावरून असं वाटतंय की हा पुरस्कार मलाच मिळायला हवा होता.” प्रेक्षकांचा आनंद यानंतरही सुरूच होता.

जमाल कुडूवर थिरकला बॉबी
‘अॅनिमल’ सिनेमातील गाजलेल्या ‘जमाल कुडू’ या गाण्यावर बॉबी देओलला थिरकण्याची विनंती प्रेक्षकांनी केली. त्याने अवॉर्डची ट्रॉफी डोक्यावर घेत गाण्यावर डान्स केला आणि नंतर काचेचा ग्लास डोक्यावर ठेवत प्रसिद्ध स्टेप केली.
बॉबीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
इन्स्टाग्रामवर बॉबीने आयफा २०२४ मध्ये मिळालेल्या समर्थनाबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार मानले. त्याने लिहिले, “तुमच्या प्रेमाचा आवाज आयफा २०२४ मध्ये खूप मोठा होता. तुम्ही अब्रारच्या शांततेचा आवाज बनलात. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार!’अॅनिमल’ हा चित्रपट माझ्यासाठी नेहमीच खास राहील आणि हा पुरस्कार एक अविस्मरणीय आठवण बनेल.”