बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. या चित्रपटातून बॉबी देओलने बॉलीवूडमध्ये दमदार कमबॅक केले आहे. ‘अॅनिमल’नंतर बॉबी देओलच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. आता लवकरच बॉबी ‘कंगुवा’ (Kanguva) या तेलगू चित्रपटात झळकणार आहे. नुकताच त्याचा चित्रपटातील खतरनाक लूक समोर आला आहे.
आज बॉबी देओल आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याने आपल्या चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. बॉवीने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘कंगुवा’ चित्रपटातील आपला पहिल्या लूकचे पोस्टर शेअर केले आहे. हा लूक शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये क्रूर, शक्तिशाली आणि अविस्मरणीय लिहले आहे. बॉबीचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट व लाईक्सचा पाऊस पाडला आहे. सनी देओलनेही या पोस्टवर कमेंट करत बॉबीच्या लूकचे कौतुक केले आहे.
‘कांगुवा’मध्ये बॉबी देओलची भूमिका काय?
‘कांगुवा’मध्ये बॉबी देओल नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या पात्राचे नाव ‘उधीरन’ आहे. या चित्रपटात बॉबीबरोबर साऊथचा सुपरस्टार सूर्याची व दिशा पटानीची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट जगभरात जवळपास ३८ भाषांमध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नसली या वर्षाच्या मध्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा- लग्नाच्या तीन वर्षानंतर यामी गौतम होणार आई? अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
बॉबी देओलला पुन्हा एकदा खलानयकाच्या भूमिकेत बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आपल्या २८ वर्षाच्या अभिनयाच्या करिअरमध्ये बॉबी पहिल्यांदाच एवढ्या जबरदस्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ‘कांगुवा’मधील बॉबी देओलचा लूक बघितल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.