९० च्या दशकात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची गणना बॉलीवूडच्या लोकप्रिय जोड्यांत केली जात होती. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी १९९७ मध्ये सुरू झाली होती रिपोर्ट्सनुसार, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रेमात पडले होते. मात्र, सलमान खानबरोबरच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने नेहमी त्यांच्या नात्याविषयी बोलणे टाळले आहे. दरम्यान ऐश्वर्या रायची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सलमान खानसोबतच्या ब्रेकअपबद्दल न बोलण्याचे कारण सांगताना दिसत आहे.

हेही वाचा- कंगना राणौतला झाली योगी आदित्यनाथांबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण; पोस्ट शेअर करत म्हणाली..”इतके महान आणि सभ्य..”

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

मात्र, सलमान खानच्या अति पझेसिव्ह वागणुकीमुळे त्याचे आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर दोघांचे चाहते खूप निराश झाले होते. ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने मौन सोडून या नात्यावर आपला राग काढला. ऐश्वर्या रायने आरोप केला होता की, सलमान तिच्याशी भांडायचा आणि मारहाण करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सेटवर असा यायचा, जणू काही घडलेच नाही.
सलमान खान अनेकदा ऐश्वर्या रायच्या चित्रपटाच्या सेटवर येऊन तमाशा करायचा. इतकेच नाही तर मुलाखतीत ऐश्वर्या रायने सलमान खानवर असाही आरोप केला होता की, २००१ मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घराबाहेर मध्यरात्री गोंधळ घातला होता. तसेच दार न उघडल्यामुळे तिला आत्महत्या करण्याची धमकीही त्याने दिली होती. या घटनेनंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी पोलिसांत एफआयआरही दाखल केला होता.

हेही वाचा- ६०० कोटी बजेट असलेल्या चित्रपटातून रणवीर सिंगची एग्झिट, आता ‘या’ दोन अभिनेत्यांमध्ये प्रमुख भूमिकेसाठी स्पर्धा

ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या तिच्या सलमानसोबतच्या नात्याबद्दल बोलत आहे. व्हिडीओमध्ये सिमी ऐश्वर्याला सलमान खानसोबतच्या ब्रेकअपचे कारण विचारताना दिसत आहे. यावर ऐश्वर्याने उत्तर दिले की, ‘हे प्रकरण आता संपले आहे. मी याबद्दल बोलू इच्छित नाही आणि त्याबद्दल विचारू नका आणि सार्वजनिक व्यासपीठावर तर नक्कीच नाही. ही गोष्ट माझ्या भूतकाळातील आहे आणि तशीच राहिली पाहिजे. मी माझ्या संकटातून मुक्त झाले आहे. आता मला याचा विचारही करायचा नाही. मला माझ्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टींबद्दल बोलणे आवडत नाही कारण मी एकटी राहत नाही. माझ्यासोबत माझे कुटुंबीय आहेत, जे या गोष्टी ऐकत आहेत.’

हेही वाचा- Video : हृतिक रोशनबरोबर फोटो काढणाऱ्या डिलेव्हरी बॉयला बॉडीगार्डने दिला धक्का; नेटकरी संतापले, म्हणाले, “कंगना म्हणालेली…”

‘मी ज्या लोकांबद्दल बोलत आहे त्यांचेही कुटुंब आहे. त्यांचे चाहतेही आहेत. मी सार्वजनिक व्यासपीठावर कोणाबद्दलही असे बोलू शकत नाही.’ तिला तिच्या भूतकाळाशी संबंधित काहीही शेअर करायचे नाही याचे हे एकमेव कारण आहे. मी अजूनही एक सामान्य मुलगी आहे हे मी विसरलेलो नाही. आणि मी ज्यांच्याबद्दल बोलत आहे तीदेखील सामान्य माणसे आहेत, असे ऐश्वर्या म्हणाली.

Story img Loader