Ira Khan And Nupur Shikhare Christian Wedding: आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने नुपूर शिखरेबरोबर काल, १० जानेवारीला ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. याआधी ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने आयराने लग्न केलं होतं. त्यानंतर आयरा व नुपूरचं लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने होईल असं सगळ्यांना वाटतं होतं. पण दोघांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल, आयरा खान व नुपूर शिखरेने लग्नासाठी खास ख्रिश्चन स्टाइल आउटफिट घातला होता. आयराने पांढऱ्या रंगाचा गाउन घातला होता. तर तिचा नवरा नुपूरने बेज रंगाचा कोर्ट-पॅन्ट परिधान केली होती. दोघं खूप सुंदर दिसत होते. आयरा व नुपूरच्या या ख्रिश्चन लग्नातील सध्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान लाडक्या लेकीला लग्नबंधनात अडकताना पाहून भावुक झालेला दिसत आहे.

हेही वाचा – ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्याने शेअर केला सेटवरचा शेवटचा दिवस, चाहती म्हणाली, “ही मालिका नसून आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग…”

आमिर खानचा हा व्हायरल व्हिडीओ ‘बॉलीवूड सोसायटी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयरा व नुपूर एकमेकांना किस करून अंगठी घालताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला लेकीला लग्नबंधनात अडकताना पाहून आमिरच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो डोळ्यावरचा चष्मा काढून रुमालाने डोळे पुसताना दिसत आहे. आमिरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – लाडकी लेक आयराच्या लग्नात आमिर खाननेही काढली मेहंदी; डिझाईनने वेधले लक्ष

दरम्यान, उदयपूरमध्ये आयरा-नुपूरचा शाही लग्नसोहळ्यानंतर मुंबईत एका पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor aamir khan emotional after daughter ira khan and nupur wedding married video goes viral pps