हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. गुजरातमध्ये भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला धक्का बसला असून येथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. हिमाचलमध्ये दर पाच वर्षानंतर सत्ताबदल होत असतो. यंदा काँग्रेसने बाजी मारली आहे. मात्र बॉलिवूडच्या अभिनेत्याचे वडील या निवडणुकीतच जिंकून आले आहेत.
लव्हयात्री, अंतिम यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता आयुष शर्मा सध्या चर्चेत आहे. त्याचे वडील अनिल शर्मा हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार चंपा ठाकूर यांचा १० हजार मतांनी त्यांनी पराभव केला आहे. अनिल शर्मा यांचे वडीलदेखील राजकरणात होते. त्यांचे वडील सुखराम शर्मा हे केंद्रात माजी दूरसंचार मंत्री होते. आयुषने वडिलांच्या विजयाची बातमी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे.
-
salman khan
आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिता खानचा नवरा आहे. त्या दोघांमध्ये छान बॉन्डिंग आहे. अनेकदा ते दोघेही एकत्र दिसतात. सलमान आयुष अंतिम चित्रपटात एकत्र दिसले होते. आयुष आता अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. रवि वर्मा आणि इमरान एस सरधारिया ही जोडी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.