पंकज त्रिपाठी, नवाझुद्दीन सिद्दीकीसारख्या कित्येक कलाकारांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हे वरदान ठरलं आहे. अशाच काही लाजवाब अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे आदिल हुसेन. आदिल हुसेन यांनी बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत, पण त्यांना खरी ओळख ओटीटी प्लॅटफॉर्ममुळेच मिळाली. अगदी मोजकेच चित्रपट करणारे आदिल हुसेन यांचं नाटकावरही प्रचंड प्रेम आहे.

नुकतंच आदिल यांनी ‘दी लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये आदिल यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला याबरोबरच मनोरंजन विश्वातील त्यांचे अनुभवही त्यांनी शेयर केले. आदिल यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. याच मुलाखतीमध्ये आदिल यांनी श्रीदेवी यांच्याबद्दल भाष्य केलं. भारतीय सिनेसृष्टीत श्रीदेवी यांना म्हणावे तितके उत्तम काम व चित्रपट मिळाले नसल्याची खंत आदिल यांनी एकदा व्यक्त केली होती.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
mohan bhagwat
Mohan Bhagwat : “घरवापसीमुळे आदिवासी देशद्रोही झाले नाहीत!” प्रणब मुखर्जींच्या विधानाचा मोहन भागवतांनी दिला दाखला
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”

आणखी वाचा : स्वतः निर्माती असूनही तापसी पन्नू करणार नाही ‘धक धक’ चित्रपटाचं प्रमोशन; म्हणाली “मला नकारात्मकता…”

याविषयी प्रश्न विचारल्यावर आदिल हुसेन म्हणाले, “मी १४ वर्षांचा होतो तेव्हा श्रीदेवी यांचा पहिला चित्रपट पाहिला ‘सदमा’ ज्यावेळी त्यासुद्धा बहुतेक त्या १४ वर्षांच्या असाव्यात. मी तो चित्रपट पाहिला तेव्हा २ दिवस माझ्या घशाखाली जेवण उतरत नव्हते. त्यानंतर मी एक दोन चित्रपट सोडले तर मी त्यांचे कोणतेही चित्रपट पाहिले नाहीत. त्यानंतर जेव्हा मी श्रीदेवीबरोबर काम केलं तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की त्या त्यांच्या कामाप्रती खूप सच्च्या आहेत. त्या फारच ग्रेसफुल आहेत. हे गुण बहुतेक कलाकारांमध्ये पाहायला मिळत नाही.”

पुढे ते म्हणाले, “श्रीदेवी या त्यांच्या सहकलाकाराला एक माणूस म्हणून, अन् कलाकार म्हणून जी वागणूक न जो सन्मान द्यायच्या तसं मी कधीच कोणत्या अभिनेत्रीच्या बाबतीत अनुभवलं नाही. मी त्यावेळी फक्त ३ चित्रपट केले होते तर श्रीदेवी यांनी ३०० हून अधिक चित्रपट केले होते तरी त्यांनी मला ज्या पद्धतीने सन्मान दिला तो केवळ दिखावा नव्हता तर त्यांचं व्यक्तिमत्त्वच तसं होतं. एक दोन चित्रपट सोडले तर श्रीदेवी यांना जसे चित्रपट अपेक्षित होते तसे चित्रपट भारतात कधीच बनले नाहीत ही माझी खंत आहे. श्रीदेवी ह्या मेरील स्ट्रीपइतक्याच ग्रेट होत्या, त्यांना उत्तम दिग्दर्शक व स्क्रिप्ट मिळाल्या असत्या तर त्यांना दहा ऑस्करसुद्धा मिळाले असते.”

Story img Loader