अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझरप्रमाणेच ट्रेलरलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.अजय सध्या चित्रपटाचे जोरदार प्रदर्शन करताना दिसत आहे. या दरम्यान अजयने ट्वीटर चाहत्यांशी संवाद साधला आहे.
पठाणच्या वेळी शाहरुखने जसे ask me हे सेशन ट्वीटर ठेवेल होते तसेच अजयने प्रमोशनसाठी ask me हे सेशन ठेवले. ज्यात चाहत्यांनी अभिनेत्याला अनेक मजेदार प्रश्न विचारले, तेव्हा एका चाहत्याने विचारले, “सर विमान उडवायला मज्जा येते की बाईक चालवायला?” त्यावर अजयने रिप्लाय दिला आहे की “लोकांना उडवायला”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
अजय देवगण, तब्बूचा ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी
अजय देवगणच्या भोलाचं बजेट हे जवळपास १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. एकंदरच या चित्रपटासाठी लोकांमध्ये असलेली उत्सुकता आणि यावर घेतलेली मेहनत पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करेल अशी आशा आहे. काही सिनेतज्ञ आणि मीडिया रीपोर्टनुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी १० ते १२ कोटीची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते आणि त्यात कार्थी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.