बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने रविवारी(२ एप्रिल) त्याचा ५४वा वाढदिवस साजरा केला. अजयला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. अजयने घराबाहेर येत चाहत्यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यादरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर जमलेल्या चाहत्यांचे अजयने हात मिळवत आभार मानले. यातील एका चाहत्याने भर गर्दीत अजयचा हात पकडला. अजयने त्या चाहत्याचा हात झिडकारुन लावला. अजय देवगणचा हा व्हिडीओ वरिंदर चावला या पापाराझी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. अजय देवगणने त्याच्या चाहत्याबरोबर केलेल्या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने शेअर केला बालपणीचा फोटो, नेटकरी म्हणाले “फक्त दाढी…”
हेही पाहा>> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो
अजय देवगणच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. “हात तर पकडला होता. प्रॉपर्टी घेतल्यासारखी काय रिएक्शन दिली आहे”, असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “भोला बॉयकॉट करा…डोकं ठिकाणावर येईल” अशी कमेंट केली आहे.

“चाहत्याने हात पकडल्यावर भोलाला राग आला” असंही म्हटलं आहे. “एकदा याचा चित्रपट पाहू नका…मग स्वत: येऊन सेल्फी घेईल”, अशी कमेंटही केली आहे.

दरम्यान, अजय देवगणचा भोला ३० मार्चला चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दिवशी अजयच्या भोलाने १० कोटींपेक्षा अधिक कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाने आतापर्यंत ४४ कोटींची कमाई केली आहे.