हिंदी चित्रपटसृष्टीमधील विनोदी चित्रपटांच्या रांगेतील गोलमाल या चित्रपटाच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. या सीरिजमधील ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’ ‘गोलमाल अगेन’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या चार चित्रपटानंतर आता पुन्हा गोलमालच्या सिरीजमधील चित्रपट कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच अभिनेता अजय देवगणने याबद्दल भाष्य केले आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा सध्या त्याच्या ‘भोला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजयचा भोला चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अजयने ‘आस्क मी सेशन’ घेतले.
आणखी वाचा : प्रसिद्ध इन्स्टा स्टारच्या व्हायरल अश्लील व्हिडीओ प्रकरणीच्या ‘त्या’ पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट, म्हणाला “देव तुला…”
यावेळी त्याला चाहत्यांनी चित्रपटासह खासगी आयुष्याबद्दल विविध प्रश्न विचारले. याच सेशनदरम्यान एका मराठी चाहत्याने अजय देवगणला मराठीत प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने मराठी भाषेतून दिलेल्या उत्तराने सर्वांचेच मन जिंकून घेतले.
“गोलमाल चा पुढचा पार्ट परत कधी येणार आहे सर..??” असा प्रश्न त्याने अजयला यावेळी विचारला. त्यावर अजयनेही चक्क मराठीतून त्याला उत्तर दिले. “संयम ठेवा”, असे अजय देवगण म्हणाला.
दरम्यान अजयच्या ‘भोला’मध्ये अजय देवगण, तबू, दीपक डोबरियाल, गजराज राव, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने सहा दिवसात ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण ५३.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.